बाळापुरच्या मुख्य रस्त्यावर पडलेला खड्डा अखेर बुजविला

बाळापुर

बाळापुर: शहराच्या मध्यभागी, खाणका एरिया आणि औरंगपुरा मार्गावर पडलेला मोठा खड्डा अखेर नगरपरिषदेच्या प्रशासनाने बुजवून रस्ता सुरळीत केला आहे.

सदर खड्डा दुलेखा खा. साहेब यांच्या घराजवळ वळण रस्त्यावर पडलेला होता, ज्यामुळे दररोज येणे-जाणे करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत होता. या रस्त्यावरून बाळापुर मार्गे शेगावकडे जाणारे भाविक, दिंडी, पालखी यांचाही वर्दळ आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आपली समस्या समाधानाची अपेक्षा व्यक्त केली होती.

अजिंक्य भारत न्यूज मध्ये बातमी झळकताच प्रशासनाने तत्काळ दखल घेत खड्डा बुजवला. स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत, अजिंक्य भारत परिवाराचे आभार मानले आहेत.

Related News

स्थानिक प्रतिक्रिया:
“मुख्य रस्त्यावरील खड्डा बुजल्यामुळे रस्ता सुरक्षित आणि सुरळीत झाला. अजिंक्य भारत न्यूजच्या माध्यमातून आमच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आल्या, त्यामुळे आम्ही ऋणी आहोत,” – सुभेदार हातोले, सामाजिक कार्यकर्ते.

read also : https://ajinkyabharat.com/both-women-of-akotcha-won-the-honor-of-jinkla-national-level-champion-at-the-national-level/

Related News