वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या महावितरणच्या विद्युत भवन कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी समोर आल्या होत्या. या कामात निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला होता. संबंधित रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच रस्ता उखडणे, चिखल निर्माण होणे व खड्डे पडणे अशी स्थिती निर्माण झाली होती. यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर अजिंक्य भारत न्यूजने या विषयाकडे लक्ष वेधत वास्तव स्थिती पुराव्यांसह जनतेसमोर मांडली होती. या वृत्तानंतर सिव्हिल विभागाने संबंधित कामाची दखल घेतली असून, निकृष्ट ठरलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कामाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
केवळ दुरुस्ती करून प्रकरण संपवले जाणार की कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी होणार, याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कामाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शक चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. अजिंक्य भारत न्यूज या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करत राहणार असून, प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीनुसार जनतेला माहिती देणार आहे.
Related News
वाशिमच्या समृद्धी महामार्गावर पतीने पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना. तीन लहान मुलांसमोर घडलेल्या या गुन्ह्यानं...
Continue reading
3 किलोमीटर चिखलातून बैलगाडीतून वडिलांना रुग्णालयात!
चिखलमय रस्त्यामुळे रुग्णवाहिका नाही : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका छोट्याशा गावातून समोर आलेल्या घटनेने ...
Continue reading
वाशिममध्ये न्यायालयाचा कडक इशारा; मोबदला थकल्यास टोल प्लाझावर जप्तीची कारवाई
Washim News: वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्य...
Continue reading
खाकीला मोठा धक्का! 9 पोलिसांना जन्मठेप; कोठडीतील मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर ऐतिहासिक न्याय
वाशिम जिल्ह्यातील 2011 मधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अत...
Continue reading
भाजपनंतर शरद पवारांच्या NCP कडूनही घोडबंदर रोडच्या नामांतराची मागणी; कारण ऐकून अनेकांना वाटेल योग्य, 16 महिन्यांत 27 मृत्यूंचा मुद्दा चर्चेत
मुंबई आणि ठाणे शहरांना जोडणारा अत्यंत ...
Continue reading
पोहरादेवी येथील ‘बणजारा विरासत’ संग्रहालयाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी; विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा
वाशिम, दि. ३० मे : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यां...
Continue reading
मद्यप्रेमींना सर्वात मोठा धक्का! इराण युद्धाचे परिणाम भारतापर्यंत, मद्याची एक बॉटल आता महागणार?
अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरु असल...
Continue reading
Multibagger Stock: टाटा कंपनीचा हा शेअर सुसाट, 1 लाखांचे झाले तब्बल 4.5 कोटी! गुंतवणूकदारांची झाली मोठी लॉटरी
भारतातील शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल...
Continue reading
अकोट : अकोट ते अकोला या महत्त्वाच्या मार्गावर रेल्वे पूल ते पैलवान बाबा मंदिर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे साईड शोल्डर न भरल्यामुळे ठिकठिका...
Continue reading
अजिंक्य भारत न्यूजवर आपण पाहत आहात वाशिम जिल्ह्यातील अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारे दृश्य. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्ग...
Continue reading
Thane-घोडबंदर रोडवर भयानक अपघात: तब्बल 14 वाहनं एकमेकांवर धडकली, अभिनेत्री ऋतुजा बागवेने सरकारला धरलं धारेवर
Thane शहरातील घोडबंदर रोडवर 9 जानेवारीला भय...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/pune-election-results-2026-pune-municipal-corporations-shocking-overthrow-10-virat-victory-6-evicted-true-power-of-democracy-revealed/