अकोट: अकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी एकही उमेदवार अर्ज दाखल केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या नव्या प्रक्रियेनुसार, उमेदवारांनी आधी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून तो अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जाची स्वाक्षरीयुक्त प्रत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करून जामिन डिपॉझिट भरणे गरजेचे आहे. मात्र, कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसल्यामुळे पहिल्या दोन दिवसांत निवडणूक कार्यालयात एकही अर्ज नोंदला गेला नाही.
नगरपरिषदेतील प्रभागनिहाय उमेदवारांची सेटिंग अद्याप ठरलेली नसल्यामुळे अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल करण्याऐवजी स्थिती पाहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुढील काही दिवस निवडणूक प्रक्रियेसाठी निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आहे.
Related News
पुणे रेल्वे स्टेशनवर 7 गंभीर त्रुटी; खासदार मेधा कुलकर्णींचा मोठा इशारा – विकास आणि वास्तवातील धक्कादायक अंतर उघड
पुणे रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि वर्द...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
‘जख्मी आहे म्हणून घातक आहे’: Raghav Chadha चे तीन मिनिटांचे व्हिडिओ आव्हान; AAP नेतृत्वावर थेट हल्ला
आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार Raghav Chadha
Continue reading
बच्चू कडू यांच्याविरोधात हत्येच्या कटाच्या आरोपाने खळबळ; गुन्हा दाखल, राजकारण तापलं
अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्...
Continue reading
AAP मध्ये उफाळलेले अंतर्गत वाद; केजरीवालांचे ‘सिपाही’ Raghav Chadha विरुद्ध आक्रमक, ‘सॉफ्ट PR’, ‘समोसा’ टोमणा आणि ‘मोदी भीती’चे आरोप
आम आदमी पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर...
Continue reading
शिंदे गटाला धाराशीव जिल्ह्यात जबर धक्का, दोन नेत्यांचा करुणा मुंडे पक्षात प्रवेश
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा घसरणारा टप्पा समोर आला आहे.
Continue reading
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याने उमेदवारांच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, पक्षांनी योग्य उमेदवार निवडून, वेळेत अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.
निवडणूक कार्यालयाचे सूत्र सांगते की, “प्रत्येक उमेदवाराने अर्ज ऑनलाइन भरल्यानंतर प्रत सादर करणे अनिवार्य आहे. जामिन रक्कम तसेच अर्जाच्या सर्व कागदपत्रांची पूर्ण तयारी असणे आवश्यक आहे.”
अकोट नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी नामांकन प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, त्यानंतर मतदानाची तारीख निश्चित केली जाईल.
read also : https://ajinkyabharat.com/shri-sant-dnyaneshwar-maharaj-sanjeevani-samadhi-sohalyala-started-at-pimpalkhuta/