“मी १५-१६ वर्षांची होते, तेव्हापासून शिखर…”, बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाली जान्हवी कपूर? जाणून घ्या

जान्हवी कपूर

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आहे शिखर पहारिया, जान्हवी कपूरला करतोय डेट

जान्हवी कपूर व शिखर पहारिया रिलेशनशिपमध्ये आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)

बोनी कपूर व दिवंगत श्रीदेवी यांची लाडकी लेक अन् बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर

पहारियाला डेट करत आहे. जान्हवीने ‘कॉफी विथ करण ८’ मध्ये तिच्या व शिखरच्या नात्याची

कबुली दिली होती. त्यानंतर अनेकदा जान्हवी शिखरबद्दल बोलत असते. दोघेही खूपदा मंदिरात

देवदर्शनाला जात असतात. तिच्या गळ्यातील ‘शिखू’ लिहिलेल्या एका नेकलेसचीही खूप चर्चा झाली होती.

आता जान्हवीने शिखर तिचा सर्वात मोठा आधार असल्याचं म्हटलं आहे.

सध्या जान्हवी तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या

निमित्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला तिच्या सपोर्ट सिस्टिमबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने शिखरचं नाव घेतलं.

खूप लहान असल्यापासून शिखर आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि आपण एकमेकांची स्वप्नं पूर्ण करण्यास मदत करतो, असा खुलासा जान्हवीने केला.

मिर्ची प्लस’च्या मुलाखतीत जान्हवीला विचारण्यात आलं की कोणत्या दोन व्यक्तींनी तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्यास साथ दिली आहे.

यावर आधी तिने तिचे आई-वडील, दिवंगत श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची

नावं घेतली आणि मग तिने शिखरचा उल्लेख केला. “मी १५-१६ वर्षांची होते, तेव्हापासून शिखर माझ्या आयुष्यात आहे.

मला वाटतं की माझी स्वप्नं नेहमीच त्याची स्वप्नं होती आणि त्याची स्वप्नं नेहमीच माझी स्वप्नं होती.

आम्ही एकमेकांची सपोर्ट सिस्टिम आहोत, जणू आम्ही एकमेकांना मोठं केलं आहे,” असं जान्हवी म्हणाली.

जान्हवी खूपदा देवदर्शनाला शिखर पहारियाबरोबर जाते. तिरुपती बालाजीमधील या दोघांचे फोटो व व्हिडीओ खूप चर्चेत असतात.

जान्हवीचे वडील बोनी यांनीही नुकतीच या दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली होती.

“शिखर खूप गोड मुलगा आहे. जान्हवी त्याला ओळखत नव्हती तेव्हापासून आमची मैत्री आहे.

तो कधीच जान्हवीला सोडून जाणार नाही, अशी मला खात्री आहे. तो नेहमीच आमच्याजवळ असतो.

संपूर्ण कपूर कुटुंबियांसह त्याचं खूप चांगलं बॉण्डिंग आहे,” असं बोनी कपूर म्हणाले होते.

जान्हवी आणि शिखर यांचं नातं आयुष्यभर टिकेल असा विश्वासही त्यांनी

व्यक्त केला होता.