क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचे लग्न चार वर्षांतच विभक्त झाले. 2020 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांमधील पोटगीचा वाद चर्चेत होता.अखेर ‘राइज अँड शाइन’ या शोमध्ये धनश्रीने सर्वांचा संशय दूर केला. गायक आदित्य नारायणने घटस्फोटाबाबत प्रश्न विचारल्यावर धनश्रीने स्पष्ट केले, “कारण आम्हाला दोघांनाही घटस्फोट हवा होता. त्यामुळे लोक जे पोटगीबद्दल बोलतात ते चुकीचे आहे.”धनश्रीने पुढे सांगितले, “मी काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता. माझ्या आईवडिलांनी मला हेच समजावलंय की फक्त जवळच्या लोकांशी स्पष्टीकरण द्यावं. ज्यांच्याशी काही संबंध नाही, त्यांच्याकडे जाऊन समजावून सांगण्याची गरज नाही.”धनश्रीने घटस्फोटाची कारणेही स्पष्ट केली. “जेव्हा हे सर्व घडताना पाहता, तेव्हा खूप त्रास होतो. या गोष्टींची गरजच नव्हती. मी फक्त इतकंच सांगू शकते की काहीच खरं नाही. मी नेहमीच समोरच्या व्यक्तीचा आदर करेन.”2025 च्या सुरुवातीलाच धनश्री आणि चहल विभक्त झाले. या काळात चहलच्या टी-शर्टवरील ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
read also:https://ajinkyabharat.com/shetkyanana-pur-affected-helpless-basis/
