पुणे : बारामतीचा विकास नेमका केला कोणी हे सांगताना पवार कुटुंबात वाकयुद्ध रंगलं आहे. संस्था कोणी काढल्या, कंपन्या कोणी आणल्या ते सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनं अगदी जोरकसपणे सुरू आहे. शरद पवारांच्या बाजूनं त्यांचे नातू रोहित पवार खिंड लढवत आहेत. तर अजित पवार पुतण्या रोहितला उत्तर देत शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत. रोहित पवारांचं शिक्षण कुठे झालं, याचा मुद्दा अजित पवारांनी रविवारी एका भाषणात उपस्थित केला. आता त्यावरुन काका, पुतण्यात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे बारामतीतलं वातावरण तापलं आहे.
अजित पवारांनी रोहित यांच्या शिक्षणाचा विषय रविवारच्या भाषणात काढला. ‘काहीजण वालचंदनगरला शिकत होते, कारण सरळ आहे. त्यावेळी फक्त वालचंदनगरलाच चांगलं शिक्षण मिळत होतं बारामतीत मिळत नव्हतं,’ असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना उत्तर दिलं. शरद पवारांनी विद्या प्रतिष्ठान काढली हा मुद्दा अजित पवारांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
काका अजित पवारांच्या टिकेला आता रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. ‘मी किती शिकलोय, काय शिकलोय, याच्याशी काय घेणं देणं आहे? मी बारामती, वालचंदनगर, मुंबई या ठिकाणी शिकलो. मी ग्रॅज्युएट आहे. मला डबल ग्रॅज्युएट व्हायचं होतं. मात्र मला होता आलं नाही. कारण माझ्या वडिलांच्या व्यवसायात अडचणी आल्या होत्या. वडील अडचणीत असताना वडिलांबरोबर राहणं, ही आपली परंपरा आहे,’ असं म्हणत रोहित यांनी काकांना प्रत्युत्तर दिलं.
Related News
कामरगाव परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कामरगाव :कायद्याचे दरवाजे अन्यायाविरुद्ध नेहमी खुले असतात, पोलीस हे त्याचे प्रथम संरक्षणकर्ते मानले जातात. मात्र, पोलिसांकडूनच कर्तव्यच्युत...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंदशरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
शरद शेगोकारअकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती म...
Continue reading
पाकिस्तानी कलाकारांनी भारताविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर, त्याला आता चोख प्रतिसाद दिला जात आहे.
फवाद खान आणि माहिरा खान यांच्यावरील कारवाईचा फटका आता प्रत्यक्ष त्यांच्या क...
Continue reading
मुंबई:
भारतातील पहिले आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईत सुरू झाले असून,
यामुळे मुंबई सागरी पर्यटनाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे. सोमवारपासून हे टर्मिनल प्रवाशांच्या स...
Continue reading
जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एकव्हिडीओ गेल्या दोन दिवसांपूर्वी समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊनअमानुष म...
Continue reading
Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता.
यातील आरोपी भाजपचा माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गट...
Continue reading
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading
Ajit Pawar : एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवा झेंडा फडकावयचा आहे.
त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. सध्या राज्यात महायुतीच सरकार आहे. भा...
Continue reading
परदेशी जाऊन शिकण्याची माझी इच्छा होती. माझे दोन भाऊ जय आणि पार्थ हे भारताच्या बाहेर शिकले, याचा मला आनंद आहे. कितीही शिकलं, पण आपल्याला आपले विचारच जगता आले नाही तर काय उपयोग? असा सवाल करत रोहित पवारांनी काकांना टोला लगावला. मी आजी, आजोबांचा, वडिलांचा विचार जपत असल्याचं म्हणत त्यांनी अजित पवारांना सुनावलं.बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.