सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भटकर यांचे प्रेरणादायक मार्गदर्शन

अभ्यासानेच मिळते यश!

“अभ्यास करुन माणूस जीवनात यशस्वी होऊ शकतो,” असे सांगत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भटकर यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. ते जवाहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जामठी (बु.) येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.राजेंद्र भटकर यांनी आजच्या काळातील शिक्षण पद्धतीचे महत्त्व, त्यांच्या उपयोगाचे मूल्य आणि थोर पुरुषांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करण्याचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळात अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी परिस्थितीशी झुंजून, रात्रीचे दिवस करून अभ्यास केला आणि यशस्वी झाले. त्यामुळे आजच्या काळात शासनाने उपलब्ध केलेल्या सुविधा विद्यार्थ्यांनी पूर्ण उपयोगात घ्याव्यात.कार्यक्रमात त्यांनी स्वरचित कविता सादर करून प्रबोधनात्मक मनोरंजन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनण्याचा आणि आपले भविष्य घडवण्याचा संदेश दिला.कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपीता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रमात प्राचार्य प्रमोद महल्लेसर, माजी प्राचार्य पी.एन. बोळे (गुरू), शालेय कर्मचारी, पतसंस्थेचे अध्यक्ष कुंदनभाऊ देशमुख, कन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका  बोळे मॅडम, माजी शिक्षक राठी , शालेय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर संचालन विमल काटकर  यांनी केले, तर आभार प्रदर्शन काळपांडे  यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शालेय प्रार्थनेने करण्यात आली.

read also : https://ajinkyabharat.com/upsc-tayarit-aslela-vidyarthi-vachala-tokacha-decision/