कारंजा शहरात दूषित पाणीपुरवठा; एआयएमआयएमचे निवेदन

कारंजा शहरात दूषित पाणीपुरवठा; एआयएमआयएमचे निवेदन

कारंजा (लाड) – शहरातील अनेक भागांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत होत असलेला पाणीपुरवठा दूषित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या संदर्भात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात सध्याच्या पाण्यात दुर्गंधी, गाळ व अपायकारक घटक असल्याने पोटाचे आजार, काविळ व संसर्गजन्य रोगांचा धोका वाढल्याचे नमूद आहे.

नागरिकांनी त्वरित पाणी शुद्धीकरण व स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी केली.

या वेळी माजी नगरसेवक इर्शाद अली, यूनुस पहेलवान, अ. रशीद, सलीम गारवे आणि काजी-ए-शहर जाकिर शेख आदींची उपस्थिती होती.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/saint-dnyaneshwar-maharaj-650th-jubilee-for-community-passay/