अकोला शहरात वाहतूक नियम धुळकावून लावणाऱ्या बेशिस्त नो पार्किंग झोन मध्ये वाहन उभ करणाऱ्यावर वाहतूक शाखा पोलिसांनी
“सर्जिकल स्ट्राईक” सुरू केला.
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेशिस्तपणे नो पार्किंग झोन असूनही चार चाकी वाहनाची पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.
अशा चार चाकी वाहनधारकांवर वाहतूक शाखाच्याकडून बे-जबाबदारपणाची गंभीर स्वरूपात दखल घेत वाहतूक शाखा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
या बेशिस्त नो पार्किंग झोन मध्ये वाहन उभ करणाऱ्या वाहनधारकांविरोधात विशेष मोहीम राबवून अकोला
जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक करून हजारो रुपयाचा दंड वसूल केला.
ही कारवाई यापुढेही सुरूच राहील असेही शहर वाहतूक शाखा निरीक्षक मनोज बहुरे यांनी इशारा दिला.
