अकोल्यात मनपाच्या हलगर्जीपणाची पोलखोल; दीड महिन्याच्या पावसातच नाले तुडुंब, सांडपाणी रस्त्यावर

अकोल्यात मनपाच्या हलगर्जीपणाची पोलखोल; दीड महिन्याच्या पावसातच नाले तुडुंब, सांडपाणी रस्त्यावर

अकोल्याच्या महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला.

अवघ्या दीड महिन्याच्या पावसातच शहरातील सांडपाण्याच्या नाल्या तुडुंब भरल्या असून नाली

मधील घाण पाणी रस्त्यावर येऊ लागले असून ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे.

दरम्यान अकोल्याच्या मनपा पूर्व झोन मध्ये येणाऱ्या उमरी परिसरातील पेट्रोल पंप समोर हा सर्व प्रकार दिसून येऊ लागला आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासन सध्या सपशेल फोल ठरल्याचं दिसून येतो.

दरम्यान महापालिकेच्या प्रशासनाने कुंभकरणाच्या झोपेतून उठून

या नाल्या साफ कराव्या अशी मागणी ही परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/under-the-operation-price-affairs-action-%e2%82%b9-%e2%82%b9-49-thousand-gutkha-seized/