“लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा; हजारो अपात्र लाभार्थ्यांवर वसुलीची कारवाई”

"लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा; हजारो अपात्र लाभार्थ्यांवर वसुलीची कारवाई"

मुंबई (प्रतिनिधी)

राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने” अंतर्गत 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांनी

अनधिकृतपणे लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

यामध्ये सरकारी सेवानिवृत्त महिला व काही पुरुषांचाही समावेश असल्याने राज्य सरकारची

मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश दिले असून,

ज्यांनी चुकीने लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत तब्बल ४८०० कोटी रुपयांचा

घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्य सरकारवर घणाघात केला आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही कडक कारवाईचा इशारा देत,

“दिशाभूल करणाऱ्यांकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाईल,” असे स्पष्ट केले आहे.

राज्य मंत्रिमंडळात या मुद्द्यावर चर्चा सुरू असून, प्रशासन लाभार्थ्यांच्या खात्यांची आणि पात्रतेची तपासणी करत आहे.

योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shaherat-besist-no-parking-june-middle-vehicle-bounted-karnayaar-wahtuk-branch-polisanchi-surgical-strike/