प्रतिनिधी, बोरगाव मंजू
सोमवार रोजी सायंकाळच्या दरम्यान अन्वी ते पळसो रस्त्यावर अज्ञात वाहनाची जबर धडक लागून
एका मोठ्या माकडाचा दुर्दैवी अपघात झाला. अपघात एवढा जबर होता की माकड जागीच ठार झाले.
Related News
सदर माकड निलेश होले नामक व्यक्तिला दिसताच त्यांनी गावातील नागरिकांना याची माहीती दिली.
या घटनेची माहीती मिळताच सर्पमित्र प्रशांत नागे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून
सामाजिक बांधीलकी जोपासत माकडावर नियमानुसार अंत्यसंस्कार केले. आणि पावसाळ्याचे दिवस
असल्यामुळे नागरिकांनी वाहन हळु चालवुन स्वताच्या जिवासोबत
प्राण्यांच्या जिवांची सुद्धा काळजी घ्यावी असे आवाहन सर्पमित्र प्रशांत नागे यांनी केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/vinanti-arj-deonhi-mokha-grampanchayat-cha-karbara-plan/
