विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.

मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी.

मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. येथील विठ्ठल उर्फ बंडूभाऊ मोहोड यांना गरुड फाउंडेशनच्या वतीने

राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले हा मानाचा आणि प्रतिभावंत पुरस्कार प्रदान

Related News

करून त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.

सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्य सन्मान करण्यात आला,

महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा झाला .

यावेळी अहिल्यादेवी नगरचे खासदार निलेश लंके ,प्राजक्ता तनपुरे ,संदीप भांड, डॉ साताप्पा खरवडे,

संजय ठेंगे ,विजय अमोलिक, गणेश कचलवार, विजय तमनर ,आकाश पुजारी ,बाळकृष्ण भोसले ,शेखर चोरगे ,

रमेश खेमनर, रामचंद्र थोरात यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

यावेळी सर्व समाजबांधवांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Read Also : https://ajinkyabharat.com/must/

Related News