अमरावती – प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज चौथ्या दिवशी पोहोचले आहे.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे,
तर वजनही ३ किलोने घटल्याची माहिती आहे.
Related News
त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी
कार्यालयाबाहेर रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन करत आहेत. काही कार्यकर्ते झोपून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रमुख मागण्या:
राज्यातील सर्व शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी
थकीत वीजबिलांची माफी
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तत्काळ मदत
सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न आल्याने आंदोलनात अधिक तीव्रता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
