अकोल्यातील दहीहंडा परिसरात पोलीस आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये
झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दहीहंडा आरोग्य प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कळसकर यांनी दहीहंडा
Related News
पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रभुदास गंडलिंगे यांच्यावर दारू पिऊन शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
डॉ. कळसकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीएसआय गंडलिंगे यांनी “तू आरोग्य केंद्रात हजर राहत नाहीस,”
असे म्हणत थेट वाद घालत शिवीगाळ केली व अत्याचाराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकीही दिली.
हा प्रकार आरोग्य केंद्रात घडला असून, त्या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.
डॉक्टरांच्या आरोपांनुसार, पीएसआय गंडलिंगे दारूच्या नशेत होते आणि त्यांनी सरकारी सेवेतील एका
अधिकाऱ्याशी गैरवर्तन केलं. या प्रकारावरून डॉ. कळसकर यांनी दहीहंडा पोलीस
ठाण्यातच तक्रार दाखल केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणाने आरोग्य आणि पोलीस यंत्रणेमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाची ठिणगी समोर आली असून,
आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bihar-nivadnuk-2025-aimim-mahaghadit-particular-honar/
