“Windows आणि Microsoft यूजर्ससाठी धोका –

"Windows आणि Microsoft यूजर्ससाठी धोका –

जर तुम्ही Windows लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा Microsoft Office, Azure सारख्या इतर

Microsoft सेवा वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

भारत सरकारच्या इंडियन कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In)

Related News

ने मायक्रोसॉफ्ट इकोसिस्टमच्या वापरकर्त्यांसाठी गंभीर सुरक्षेचा इशारा जारी केला आहे.

कशामुळे धोका निर्माण झाला आहे?

CERT-In च्या अ‍ॅडव्हायजरीनुसार, Microsoft च्या अनेक सेवा आणि प्रॉडक्ट्समध्ये

धोकादायक ‘विकनेस’ (कमकुवत सुरक्षा प्रणाली) आढळल्या आहेत, ज्या सायबर गुन्हेगारांना

डेटा चोरण्याची किंवा संपूर्ण सिस्टीम क्रॅश करण्याची संधी देऊ शकतात. विशेष म्हणजे,

या समस्यांचा प्रभाव केवळ विंडोज वापरकर्त्यांवरच नव्हे, तर Mac, Android, आणि Azure वापरणाऱ्यांवरही होऊ शकतो.

धोक्यात असलेल्या सेवा:

  • Microsoft Windows

  • Legacy Microsoft Products साठी Extended Security Updates (ESU)

  • Microsoft Office

  • Microsoft Azure

  • Microsoft Developer Tools

  • Microsoft Apps

  • Microsoft System Center

  • Microsoft Dynamics

सुरक्षित राहण्यासाठी काय करावं?

CERT-In च्या सूचनेनुसार, सर्व व्यक्ती आणि व्यवसायिक वापरकर्त्यांनी तात्काळ

Microsoft कडून आलेले लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट्स इंस्टॉल करावेत. याशिवाय,

  • Microsoft Office आणि इतर अ‍ॅप्स अपडेट ठेवावेत.

  • IT प्रशासकांनी आणि सिक्युरिटी टीम्सनी अँटीव्हायरस, मॅलवेअर डिटेक्शन सॉफ्टवेअर अपडेट ठेवावं.

  • नेटवर्क मॉनिटरिंग आणि सुरक्षा प्रणाली सतत सक्रिय ठेवाव्यात.

जर तुम्ही Microsoft च्या कोणत्याही सेवा किंवा उपकरणांचा वापर करत असाल,

तर ही सुरक्षा संबंधित अडचण तुमच्यापर्यंत येण्याआधीच तुम्ही तुमची सिस्टीम अपडेट

करून सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक आहे. CERT-In च्या अलर्टकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या

वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Read Also : https://ajinkyabharat.com/22-years-old-retired-wan/

Related News