पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेल्या 36 बंगल्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने
आज सकाळपासून धडक कारवाई सुरू केली. सुप्रीम कोर्टाने रहिवाशांचा अपील
Related News
जास्त माउथवॉश वापरल्याने होऊ शकतो उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका, डॉक्टरांनी दिला इशारा
सकाळी उठल्यावर दात घासणे ही सवय आपल्यापैकी बहुतांशांची आहे. अनेकजण तर ५-५ मिनिटे ब्रशने दा...
Continue reading
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी घरगुती फेसपॅक आणि आयुर्वेदिक तेल वापरा
आपली त्वचा नेहमी निरोगी, उजळ आणि चमकदार दिसावी ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. विशेषतः सणासुदी, विवाह सम...
Continue reading
सोमवारी शेअर बाजाराला बूस्टर डोस! गिफ्ट निफ्टीतून मिळाले तेजीचे संकेत
भारतीय शेअर बाजारासाठी सोमवारी एक मोठा बूस्टर डोस मिळणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी
Continue reading
यवतमाळ नगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियान सन्मान; ५ कोटींचा निधी जाहीर
यवतमाळ : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट का...
Continue reading
बुलढाण्यात लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे लग्नाच्या आमिषाखाली प्रेमविश्वासघाताची धक्...
Continue reading
हिंगोलीतील 61 वर्षीय आजी फेमिदा बेगम यांनी दहावीची परीक्षा पूर्ण केली; शिक्षणासाठी वय महत्वाचं नाही
शिक्षणाला वय नसतं हेच खरं आहे
Continue reading
शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात परप्रांतीय चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; भाविकांमध्ये चिंता
शिर्डी – महाराष्ट्रातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात चोरीच्या...
Continue reading
पॅनकार्ड: १० अंकी पॅन नंबरचा अर्थ आणि महत्त्व
भारतात आर्थिक व्यवहार करताना पॅनकार्ड ही एक अनिवार्य ओळखपत्र आहे. आजच्या काळात बँक खाते उघडणे, कर भरणे,...
Continue reading
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हटवण्याचा वाद, मनोज जरांगे पाटीलांचे जोरदार टीकास्त्र
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात
Continue reading
चिंचखेड खुर्दमध्ये शिवजयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिर
चिंचखेड खुर्द येथील विश्र्वशांती बुद्ध विहार समिती ट्रस्ट यांच्या वतीने जेतवन बाल उद्यान य...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांसाठी आणखी एक मोठा धक्का; विजेतेपदाचा दावेदार घराबाहेर
Bigg Boss Marathi 6 सीझनमध्ये या आठवड्याचे एलिमिनेशन...
Continue reading
Anupamaa 21 February 2026 Update: कोठारींच्या आनंदावर येतोय संकट, अनुपमा घेत आहे नेतृत्व
स्टारप्लसवरील लोकप्रिय मालिका Anupamaa आपल्या प्रेक्षकांना न...
Continue reading
अर्ज फेटाळल्यानंतर ही कठोर कारवाई आवश्यक ठरली,
आणि आजपासूनच ही बंगले बुलडोझरने जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकाच दिवसात स्वप्न कोसळले
“स्वप्नातलं घर डोळ्यांदेखत पाडलं जातंय,” असं म्हणत अनेक रहिवाशांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.
‘रिव्हर व्हिला’ प्रोजेक्टमध्ये उभारलेले हे 36 बंगले कोट्यवधींचे होते, काहींनी आपले संपूर्ण
आयुष्यभराचे savings या घरांमध्ये गुंतवले होते. 29 रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली होती,
पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश कायम ठेवल्याने बंगले पाडणे अनिवार्य झाले.
कायदेशीर पार्श्वभूमी
हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार 31 मेपूर्वी ही बांधकामे पाडावी लागणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने अपील नाकारले असून पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ही बांधकामे बेकायदेशीर ठरवण्यात आली आहेत.
संबंधित विकासक जरे वर्ल्डवरही गंभीर आरोप आहेत. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या प्लॉट्सना रहिवाशी क्षेत्र असल्याचे दाखवले.
प्रशासनाची कारवाई
आज सकाळी 8 पासून कारवाई सुरू झाली असून 25 टक्के तोडकाम पूर्ण करण्यात आले आहे.
पोलिस बंदोबस्तात बुलडोझरच्या साहाय्याने काम वेगात सुरू आहे.
महापालिका, पोलीस आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी कारवाईचे निरीक्षण करत आहेत.
कोसळलेली स्वप्नं, उठलेले प्रश्न
रहिवाशांनी पालिकेवरही आरोप केले की, “बांधकाम सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी
परवानगी देण्याच्या नावाखाली पैसे घेतले, आणि आता आम्हाला जबाबदार धरले जात आहे.
” या संपूर्ण घडामोडीने भ्रष्टाचार, नियोजनशून्यता आणि पर्यावरणाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
पर्यावरण विरुद्ध विकास?
हा संपूर्ण वाद पर्यावरणाच्या रक्षणाचा आणि अनधिकृत विकासाचा टोकाचा संघर्ष दाखवतो.
इंद्रायणी नदीचे पात्र राखण्यासाठी न्यायालयाने कडक भूमिका घेतली असली, तरी या बेकायदेशीर
बांधकामांना परवानगी देणाऱ्या यंत्रणांवर कोणतीही कारवाई होणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kangresamadhye-gondha-vadhatoy-maji-aamdarshana-gatachi-swatantra-chav-suru/