पाहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याला भारतीय
लष्कराने ७ मेच्या रात्री सडेतोड प्रत्युत्तर दिलं. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी
तळांवर मिसाइल हल्ले करण्यात आले. या कारवाईमुळे देशभरात उत्साहाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे.
Related News
राजस्थानच्या लाठीमधून पाकिस्तानी वैमानिक जिवंत पकडला, JF-17 लढाऊ विमानात होता सवार
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
मुंबईकरांचा प्रवास महागला!
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
याच पार्श्वभूमीवर भारतातील माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेत्यांनी भारतीय
सशस्त्र दलाच्या धाडसी पावलाचं जोरदार कौतुक केलं आहे.
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी “धर्मो रक्षति रक्षतः. जय हिंद की सेना.
” अशी एकाच ओळीची पण प्रभावी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, ती शौर्य आणि श्रद्धेचं प्रतीक बनली आहे.
सुरेश रैनानेही भारतीय सेनेचं अभिनंदन करत म्हटलं की, “जे भारताच्या रक्षणासाठी उभे आहेत, त्यांना सलाम! जय हिंद.”
या कारवाईबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विटर (X) वर प्रतिक्रिया देताना म्हटलं,
“आपल्या सशस्त्र दलांवर आम्हाला अभिमान आहे. जय हिंद!”
या संपूर्ण कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव सुचवलं आहे.
यामागील भावना ही त्या नवविवाहित महिलांच्या ‘सिंदूरा’साठी आहे, ज्यांचे पती धर्म विचारून दहशतवाद्यांनी पाहलगाममध्ये ठार केले होते.
ही केवळ सैनिकी कारवाई नव्हती, तर ती एक भावनिक आणि देशभक्तीची चपखल प्रतिक्रिया होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindurdar/