‘सितारे जमीन पर’ सिनेमाची अधिकृत घोषणा;

‘सितारे जमीन पर’ सिनेमाची अधिकृत घोषणा;

आमिर खान आणि जिनीलिया देशमुख प्रमुख भूमिकेत, २० जूनला होणार प्रदर्शित

२००७ साली प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि समाजाला एक नवा दृष्टिकोन देणारा ‘तारे जमीन पर’

हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता या सिनेमाचा स्पिरिच्युअल सीक्वल म्हणून ‘सितारे जमीन पर’

Related News

हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या आगामी सिनेमाचे पहिलं

अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून याची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

या पोस्टरमध्ये आमिर खान एका स्टायलिश लूकमध्ये दिसत असून, त्याच्यासोबत काही दिव्यांग मुलांची झलकही दिसून येते.

या सिनेमात अभिनेत्री जिनीलिया देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार असून,

ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.

मात्र, जिनीलियाच्या भूमिकेबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा देखील एक संवेदनशील विषय मांडणारा असून,

‘तारे जमीन पर’प्रमाणेच प्रेक्षकांच्या भावना स्पर्शून जाण्याची शक्यता आहे.

हा बहुप्रतिक्षित सिनेमा येत्या २० जून २०२५ रोजी थेट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक हृदयस्पर्शी प्रवास अनुभवायला मिळणार आहे का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidya-avakali-paus-ukada-khali-pan-shetkyanchi-chinta-vadhali/

Related News