सूरत:
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात सूरतमधील शैलेश
कलथिया यांचा मृत्यू झाला. बुधवारी उशिरा त्यांचे पार्थिव सूरतमध्ये आणण्यात आले
Related News
देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250 नव्या शाखा उभारणार
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल...
Continue reading
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
आणि गुरुवारी त्यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना शेवटचा निरोप दिला.
या अंत्ययात्रेत केंद्रीय गृहमंत्री सी.आर. पाटील, गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी,
शिक्षणमंत्री प्रफुल पनसेरिया, तसेच अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरात सर्वत्र शोकाकुल वातावरण पसरले होते.
“सुरक्षिततेच्या भरवश्यावर गेलेलो… पण तीच फसवली” – शहीद शैलेश यांची पत्नी शीतल कलथिया यांचा संताप
केंद्रीय मंत्री पाटील यांनी शैलेश यांच्या पत्नी शीतल कलथिया यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
मात्र, यावेळी शीतल यांनी पहलगाममधील असुरक्षिततेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
“सरकार आणि लष्करावर विश्वास ठेवून आम्ही तिथे गेलो. जर तिथे योग्य सुरक्षा व्यवस्था असती,
तर हा हल्ला टाळता आला असता,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
शीतल यांनी पुढे असा आरोप केला की, “हल्ल्यानंतरही खाली असलेल्या सैन्य दलांना वर घडलेल्या घटनेबाबत माहिती नव्हती.
आम्ही अॅम्ब्युलन्स बोलावल्यावरच त्यांना कळलं की काहीतरी गंभीर घडलं आहे.” त्यांच्या या अनुभवाने उपस्थित सर्वांच्या भावना चिघळल्या.
शैलेश यांच्या बहिणीची केंद्र सरकारकडे न्यायाची मागणी
शैलेश यांच्या बहिणीनेही केंद्र सरकारकडे न्यायाची मागणी केली. “आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ हिरावला गेला आहे.
आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची विनंती आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
हल्ल्याची जबाबदारी ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ ने घेतली; केंद्र सरकारकडून कठोर पावले
या भयंकर हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ ने घेतली आहे.
हल्ल्यानंतर केंद्र सरकारने अटारी-वाघा सीमारेषा बंद करणे आणि सिंधू जलसंधी स्थगित करणे यांसारखी कठोर पावले उचलली आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/pantpradhan-chitrachya-isharyacha-pakistanchaya-share-market-results/