बुद्धगया आंदोलनासाठी अकोल्यातून विशेष रेल्वे गाडी सोडावी – वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

वंचित बहुजन आघाडीची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

अकोला | प्रतिनिधी

महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बुद्धगया येथे १६ व १७ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी

अकोला जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यामुळे अकोला ते बुद्धगया आणि

Related News

परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी

अकोला जिल्ह्याच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

आंदोलनाचा हेतू काय?

महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनातून बौद्ध समाजाला वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत,

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन बुद्धगया येथे होणार आहे.

१६ व १७ एप्रिलला होणाऱ्या या आंदोलनात अकोला व परिसरातील जिल्ह्यांतील हजारो अनुयायी सहभागी होणार आहेत.

विशेष रेल्वेची मागणी का?

हे लक्षात घेता, १५ एप्रिल रोजी सकाळी अकोल्यातून बुद्धगयाकडे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी उपलब्ध करून द्यावी,

तसेच १७ एप्रिल रोजी सायंकाळी परतीस बुद्धगया ते अकोला विशेष रेल्वे गाडी सोडावी,

अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

या मागणीसाठी रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले असून,

अकोल्यातून सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेतला जावा,

अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे.

Related News