पातूर तालुका प्रतिनिधी | माझोड
राज्य महामार्ग क्रमांक २८४ वरील माझोड – बाभुळगाव रस्त्याचा कि.मी. ५२ ते ६५ दरम्यानचा भाग अत्यंत खराब
झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता.
Related News
मनभा परिसरात संततधार पावसामुळे दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हिंदी जीआरवर सरकारची माघार; ठाकरेबंधूंच्या एकतेमुळे मराठी ताकद उभी – संजय राऊतांचा दावा
हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक; “जाधव येऊ देत की कोणीतरी… आम्ही खपवून घेणार नाही!”
अकोला जिल्ह्यात व्यवसाय शिक्षण अधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत
शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या गौरी व वैभवीचा सत्कार
बोर्डी ग्राम पंचायत थकित गौण खनिज दंड वसुली प्रकरण गुलदस्त्यात
कुंडामधून गरम पाण्याचा झरा : अद्भुत घटना
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
नागरिकांकडून सातत्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती.
ही बाब लक्षात घेऊन अकोल्याचे युवा खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, CRF (Central Road Fund) अंतर्गत ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांत समाधानाची लाट पसरली आहे.
तसेच, संपूर्ण बाळापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल १९ कोटी रुपयांचा निधी CRF अंतर्गत मंजूर झाल्याबद्दल आज
परिसरातील नागरिकांच्या वतीने खा. अनुपभाऊ धोत्रे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभात भाजपाचे ज्येष्ठ नेते पुंडलिकराव आखरे, युवा उद्योजक व शेतकरी इंजि. श्रीकांत बराटे, रमाकांत भरकर,
शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ परनाटे यांनी खासदार धोत्रे यांचे अभिनंदन करत त्यांचे आभार मानले.
यावेळी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीणजी देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.
रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.