विवादित वक्तव्य प्रकरणी कुणाल कामरा अडचणीत, शिवसेनेचे राज्यभर आंदोलन विनोदी कलाकार कुणाल कामरा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप उसळला आहे. या प्रकरणावरून मुंबईतील एका हॉटेलमध्ये तोडफोड देखील करण्यात आली. या वादानंतर कामराच्या शोचे आयोजक कार्यक्रम रद्द करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे. अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात शिवसैनिकांनी ‘जोडेमारो’ आंदोलन करत कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारले आणि पायाखाली तुडवले. या वादानंतर कुणाल कामरा यांची प्रतिक्रिया येणे बाकी असून, राज्यभर यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

विवादित वक्तव्य प्रकरणी कुणाल कामरा अडचणीत, शिवसेनेचे राज्यभर आंदोलन

विनोदी कलाकार कुणाल कामरा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप उसळला आहे.

Related News

या प्रकरणावरून मुंबईतील एका हॉटेलमध्ये तोडफोड देखील करण्यात आली.

या वादानंतर कामराच्या शोचे आयोजक कार्यक्रम रद्द करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे.

अकोल्यात मदनलाल धिंग्रा चौकात शिवसैनिकांनी ‘जोडेमारो’ आंदोलन करत कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारले आणि पायाखाली तुडवले.

या वादानंतर कुणाल कामरा यांची प्रतिक्रिया येणे बाकी असून, राज्यभर यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

 

 

Related News