तेल्हारा (दि.) – शहरातील कब्रस्तानमधील विविध समस्या रमजान ईदपूर्वी सोडवण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कब्रस्तानकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, नाल्यातील चिखल आणि खोल वाटांमुळे मुस्लिम बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अंत्यविधी व धार्मिक विधींसाठी जाताना मोठी कसरत करावी लागत असून, ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. तसेच, कब्रस्तानमध्ये स्वच्छतेचा अभाव असून, मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे.
Related News
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर! महिलांनी सीटवर मारल्या उड्या; Viral VIDEO ला 2 लाखांहून अधिक Views
मुंबई लोकलमध्ये 1 झुरळाचा धक्कादायक कहर...
Continue reading
FIFA World Cup 2026 दरम्यान FIFA ने मराठीतून केलेल्या 8 भन्नाट सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. रोनाल्डो, मेस्सी, हॅरी केन, मुसि...
Continue reading
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या AI अॅनिमे व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. निर्णायक सामन्यापूर्वी व्हायरल झालेल्या या भावनिक व्हिडिओमागची संपूर्ण...
Continue reading
'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांच्या लेकीचं शाही लग्न; डान्स, गाणी आणि व्हायरल VIDEO ने जिंकली मनं
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत 'तारक मेहता'ची भूमिका साकारून घरा...
Continue reading
राजकोट हत्याकांड: सोशल मीडियावरील प्रेमाची 7 धक्कादायक सत्ये! पत्नी समजलेल्या व्यक्तीचा निघाला पुरुष, संतापातून खून
गुजरातमधील राजकोट येथे सोशल मीडियाव...
Continue reading
'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये आलिया भट्टने पैसे घेऊन सहभाग घेतला का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं भन्नाट उत्तर. जाणून घ्या सं...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताची खराब सुरुवात झाल्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन पुन्हा अपयशी ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या...
Continue reading
WhatsApp Username Feature 2026 मुळे गोपनीयता आणि सायबर सुरक्षेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. मनीष सिसोदियांना स्वतःच्या नावाचे U...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
धावत्या ट्रेनमध्ये उलटा लटकला तरुण; व्हायरल रीलचा धक्कादायक VIDEO पाहून नेटकरी हादरले
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याची प्रचिती देणारा एक धक्कादाय...
Continue reading
रोनाल्डोच्या एका चाहत्याने शहरभर पोस्टर्स लावून QR कोडद्वारे ७ रुपयांचे डोनेशन मागितले. दोन दिवसांत १,२०० रुपये जमा करून त्याने रोनाल्डोच्या विजयासाठी...
Continue reading
पालिकेने यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कब्रस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
याशिवाय, कब्रस्तानच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त उर्वरित गेट बंद करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हा रस्ता परिसरातील शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा असून, शेतमाल वाहतूक करणे कठीण झाले आहे.
मागील दोन वर्षांत रस्ता सुधारण्याची वारंवार मागणी करण्यात आली, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
या मागण्यांसाठी रस्ता विकास संघर्ष समिती, मुस्लिम आणि शेतकरी बांधवांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनावर रामभाऊ फाटकर, मतीन शाह, मो. शारिक, शारूख पठाण, शेख रहेमान, शेख सलीम, शेख फरीद, सय्यद निसार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नागरिकांनी रमजान ईदपूर्वी या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.