पश्चिम महाराष्ट्रातील भाजप मंत्री जयकुमार गोरे यांवर अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप आहे.
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या आरोपांना गोरे यांनी खंडन केले आहे.
ते म्हणाले की, 2017 च्या एका प्रकरणात कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.
त्यांनी आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आणि राजकीय विरोधकांवर टीका केली आहे.
Related News
CJP आता मोठं पाऊल उचलणार? भाजपच नव्हे तर काँग्रेससह विरोधकांचंही टेन्शन वाढणार; पुढचा निर्णय काय?
CJP News : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या र...
Continue reading
नितीन गडकरी यांच्या अडचणीत वाढ? NEET नंतर आता E20 पेट्रोलचा मुद्दा चिघळणार; 4 ऑगस्टला थेट संसदेवर मोर्चा
E20 Petrol Protest : देशभरात E20 प...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास, म्हणाले- ‘आता निवडणूक लढणार नाही’
Siddaramaiah News
Continue reading
145 किमी वेगाच्या चक्रीवादळाचा चीनला तडाखा; लाखो लोक संकटात, हाय अलर्ट जारी
Typhoon Noul : चीनच्या दक्षिण भागात नोल चक्रीवादळाने मोठा कहर केला आह...
Continue reading
कापलेली फळे लगेच काळी पडतात? फळे ताजी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करून पाहा
फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञदे...
Continue reading
मोदींच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न? एकनाथ शिंदेंच्या आरोपांनी खळबळ; राहुल गांधींवर गंभीर निशाणा
केंद्रीय शिक्षणमंत्री...
Continue reading
Petrol Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प...
Continue reading
मोठी बातमी! ‘तर हे घडलंच नसतं’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, केली मोठी मागणी
केंद...
Continue reading
EPFO: नोकरी संपली तरी कमाईचे मीटर सुरूच? जाणून घ्या PF खात्यावर व्याज मिळण्याचा नेमका नियम
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा नोकरी करणाऱ...
Continue reading
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी प्रथिनेयुक्त पनीरपासून बनवा ‘या’ 5 सोप्या रेसिपी; आरोग्यासाठीही फायदेशीर
चविष्ट आणि पौष्टिक आहारासाठी पनीरपासू...
Continue reading
ठाकरे बंधूंची ‘लंच डिप्लोमसी’; उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर, दोन तास चर्चा… राज्याच्या राजकारणात काय घडतंय?
केंद्रीय शिक्षणमंत्...
Continue reading
IND vs PAK : टीम इंडियाने पुन्हा पाकिस्तानला दिला धक्का; फायनलमध्ये 3-1 ने पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपवर नाव कोरलं
भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली हो
पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या मोठ्या वादात सापडले आहेत.
त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार
संजय राऊत यांनी त्यांच्यावर हे आरोप केले असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी गोरेंवर कडाडून टीका केली.
विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. याच सर्व आरोपांच्या,
घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली.
2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता.
2017 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती.
त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता.
आणि त्यावर ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला. त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे,
त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता.
आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार जयकुमार यांनी केला.
माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे, असं जयकुमार गोरे म्हणाले.
या देशात लोकशाही आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायलय आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला ( 2019) आता सहा वर्ष झाली आहेत.
आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला आहे. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा,
याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असं मला वाटत. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाने,
ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोतचवलं, त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिलं नाही.
एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं हे मला अपेक्षित नव्हतं.
या घटनेचा कोर्टाने निकाल दिलेला आहे, आणि या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आरोप केला आहे,
त्या प्रत्येकावर सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याचे गोरे यांनी नमूद केलं,
त्या लोकांना कोर्टात खेचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.