Tiradi Agitation : स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणात नवनवीन खुलासे आणि दावे करण्यात येत
असताना संघटना सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी याप्रकरणात आंदोलन छेडले आहे.
गृहराज्यमंत्र्यांच्या विधानावर सुद्धा संताप व्यक्त करण्यात आला आहे.
Related News
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर...
Continue reading
IMD Weather Update : बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र; विदर्भाला पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात पुढील चार दिवस कोरडे हवामान
बंगालच्या खाडीत निर्माण झाले...
Continue reading
ENG vs PAK : पाकिस्तानला मिळाला नवा वकार युनुस? रजाउल्लाहने पहिल्याच कसोटीत उडवली खळबळ
ENG vs PAK : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रि...
Continue reading
दिवा-मुंब्रा वळणावर लोकलमधून महिला खाली पडली; सकाळच्या गर्दीच्या ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबई : मुंबईची लोकल म्हणजे लाखो चाकरमान्यांच्या दैनंदिन आयु...
Continue reading
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; करपलेल्या पिकांचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण, नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा
Maharashtra Farmer News...
Continue reading
मराठा आरक्षण आंदोलनात अण्णा हजारे यांची उडी; Manoj Jarange Patil यांना दिला महत्त्वाचा सल्ला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Patil
Continue reading
शुक्र गोचर 2026: 11 सप्टेंबरला स्वाती नक्षत्रात शुक्राचा प्रवेश; कन्या, कर्क आणि कुंभ राशींना लाभ
Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शुक्...
Continue reading
MPSC : लाल दिव्याच्या गाडीतून येणार होता, पण अॅम्ब्युलन्समधून आला; प्रथमेशच्या आईचा आक्रोश ऐकून अभिजीत दीपकेही हेलावले
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्...
Continue reading
Trump Dividend : Trump कडून ‘लाडकी बहिण’ योजनेसारखी घोषणा? मिडटर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकन नागरिकांना 5 हजार डॉलर देण्याचं आश्वासन
Donald Trump : ...
Continue reading
MPSC प्रकरणावरून अभिजीत दिपके आक्रमक; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज्य सरकारला इशारा
Abhijeet Dipke on MPSC Paper Leak...
Continue reading
डाग आणि मुरुमांच्या समस्येवर तांदळाचं पाणी खरंच उपयोगी? खर्च न करता त्वचेची अशी घ्या काळजी
Skin Care Tips : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्...
Continue reading
Prasad Oak म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, दिग्दर्शक आणि परीक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्य...
Continue reading
स्वारगेट बस स्थानाकात बलात्कार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याने सामाजिक संघटना
आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणात नवनवीन दावे आणि खुलासे करण्यात येत
असताना पुण्यात महिला जागर समितीकडून तिरडी आंदोलन करत या अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला.
आरोपी दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला आंदोलकांनी केली आहे.
पुण्यात स्वारगेट
बसस्थानकात फलटण येथे जाण्यासाठी भल्या पहाटे तरुणी आली होती.
तिला एका बसमध्ये नेत आरोपीने बलात्कार केला होता. याची माहिती तरुणीने मित्राला दिली.
त्याने तिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर घटना उजेडात आली.
हे प्रकरण समोर आल्यापासून आरोपी फरार होता. त्याला ऊसाच्या शेतातून पोलिसांनी मध्यारात्री अटक केली.
आरोपीच्या वकिलांनी हा सर्व प्रकार संमतीतून झाल्याचा आणि दोघेही एकमेकांना ओळखत असल्याचा दावा
केल्याने वादाची ठिणगी पडली. या दोघांमध्ये साडेसात हजार रुपयांच्या व्यवहार झाल्याचा दावा सुद्धा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम
यांनी सदर घटना घडली त्यावेळी या एसटी जवळ दहा ते पंधरा लोक हजर होते.
तरुणीने आरडाओरड केली नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली.
आंदोलनकर्त्या आक्रमक
आज या घटनेचा आणि आरोपीचा महिला जागर समितीकडून तीव्र निषेध करण्यात आला.
इतकेच नाही तर आंदोलनकर्त्या महिलांनी गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य हे असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी राज्यात स्त्रीयावरील अत्याचारात वाढ झाल्याचे आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गु्न्हेगारांवरती कारवाई करा
सुरक्षा कक्षाच्या काचा फोडल्या आहेत त्या भरुन देता येतील पण तरुणीच्या चारित्र्याच्या काचा फुटल्या त्याच काय?
असा सवाल शिवसेना नेते वसंत मोरे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावरती कारवाई करण्यापेक्षा
गुन्हेगारांवरती कारवाई करा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली. आमच्यावरती कारवाई झाली तरी हरकत नाही अस्वलाच्या
अंगावर एक केस वाढल्याने फरक पडत नाही. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी शहराच्या सुरक्षेतेकडे लक्ष द्यावं,
असे मोरे म्हणाले. स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार संदर्भातील आरोपीच्या वकिलाचे स्टेटमेंट हे प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोपी ही त्यांनी केला.
Read more news here :https://ajinkyabharat.com/hi-ray-summer-mumbai/