‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानींचा गुगलवर सर्च: “ये सिंदूर होता क्या है?”

२३ मिनिटांत पाकिस्तानचा माज उतरवणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानींचा गुगलवर सर्च: “ये सिंदूर होता क्या है?”

पहलगाममधील निर्दोष पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ठामपणे घेतला आहे.

मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त

काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.

Related News

या कारवाईत अवघ्या २३ मिनिटांत दहशतवादी गट लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या बस्तानांवर कडाडून हल्ला करण्यात आला.

भारताच्या या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक घडामोडीनंतर पाकिस्तानमधील नागरिक सैरभैर झाले असून, गुगलवर

“ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर अटैक काय आहे?” यांसारख्या कीवर्डसचा शोध घेत आहेत.

गुगल ट्रेंड्सनुसार, पाकिस्तानमध्ये “India Attack Bahawalpur”, “India Attack on Pakistan Today”,

“India Strikes Pakistan” असे अनेक कीवर्ड ट्रेंडिंगमध्ये आहेत. तसेच, “Indian Army vs Pakistani Army”,

“Most Powerful Army” यांसारख्या शोधवाक्यांतून भारतीय लष्कराविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले असल्याचे समोर आले आहे.

पहलगाम हल्ल्यात नवविवाहित महिलांचे ‘सिंदूर’ पुसले गेले, त्या वेदनेचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी हे नाव देण्यात आले.

Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-halliyala-sadetod-reply/

Related News