मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एक ठार – सहा ते सात जण जखमी

मूर्तिजापूरमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, एक ठार - सहा ते सात जण जखमी

अकोला (प्रतिनिधी) – अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरातील सिरसो बेड्यावर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

    झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मूर्तिजापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

  एकाचा मृत्यू, सहा ते सात जण जखमी

➡ या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत.
➡ जखमींमध्ये महिलांचाही समावेश असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
➡ घटनास्थळी मूर्तिजापूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Related News

  किरकोळ कारणावरून वाद

➡ मिळालेल्या माहितीनुसार, हा वाद किरकोळ कारणावरून सुरू झाला आणि त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले.
➡ घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

  जखमींवर उपचार सुरू

➡ सर्व जखमींवर मूर्तिजापूर आणि अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

👉 या घटनेनंतर मूर्तिजापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,

      पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सतर्कता वाढवली आहे.

Related News