अकोला: अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील रसुलपूर येथील एका अल्पभूधारक युवा शे तकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. योगेश हरणे (वय ३५) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी शेतात विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश हरणे हे शेतकरी चळवळीत सक्रिय होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी अनेक आंदोलने केली होती. मात्र, शेतीतील नापिकी, वाढते कर्ज, आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी यामुळे ते सतत तणावाखाली होते. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आणखी वाढली होती. दोन लहान मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांची देखभाल आणि शेतीवरील कर्ज यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते.
३ पट वाढलेले कर्ज ठरले आत्महत्येचे कारण
Related News
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहारात कढीपत्त्याचा समावेश? जाणून घ्या फायदे आणि योग्य वापर
आजच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढलेले वजन ही अन...
Continue reading
भारताची परकीय गंगाजळी ऑल टाइम हाय; 740.803 अब्ज डॉलरवर झेप
जागतिक आर्थिक अनिश्चिततेत भारताची मोठी कामगिरी; परकीय चलनसाठ्यात 11.475 अब्ज डॉलरची वाढ
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक म...
Continue reading
मोदींनी आधीच इशारा दिला होता, पण आम्ही दुर्लक्ष केलं; बेल्जियमच्या पंतप्रधानांची स्पष्ट कबुली
भारत दौऱ्यावर आलेल्या बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांचं मोठं वक्तव्य; युरोपच्य...
Continue reading
योगेश यांच्या शेतीवर सुरुवातीला ९० हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र, व्याज वाढत गेल्याने हे कर्ज तब्बल २ लाख ७० हजारांपर्यंत पोहोचले. कर्ज फेडण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. विषप्राशन केल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले, वृद्ध आई-वडील आणि दोन भाऊ आहेत.
शेतकरी चळवळीला मोठा धक्का
योगेश हरणे हे शेतकरी संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ता होते. त्यांनी प्रशासनावर वारंवार दबाव टाकून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या निधनामुळे शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
सरकारवर टीका
या घटनेनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सरकार संवेदनशील असते, तर असे प्रकार थांबले असते,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात .