विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त आलेगावमध्ये मंत्रपठणाचा उत्सव;

विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त आलेगावमध्ये मंत्रपठणाचा उत्सव;

आलेगाव प्रतिनिधी

जैन साध्वी कोटा संघ प्रवर्तनी परमपूज्य प्रभा कवरजी म.सा. आणि प्रकाश कवरजी म.सा.

यांच्या आध्यात्मिक विचार प्रेरणेतून साकारलेली जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट, आलेगाव,

Related News

ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत कार्यरत शाळा असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात

विभागस्तरावर व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेली शाळा आहे.

शाळेमध्ये विश्व नवकार मंत्र दिनाचे औचित्य साधून भव्य मंत्रपठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे नवकार मंत्राचे पठण केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एडव्होकेट विक्रमजी जाधव सर, अनिलजी जाधव सर, तर अध्यक्ष म्हणून

अक्षय जैन सर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक महावीर सर यांनी नवकार मंत्राचे मानवी जीवनाशी असलेले नाते विशद करताना,

“हा मंत्र आपल्या आदर्शांप्रतीचा विनम्र भाव दर्शवतो,” असे सांगितले.

विक्रमजी जाधव सर यांनी आपल्या भाषणात “भारतीय संस्कृतीवर चैनीझमचे फुल फुलले असून,

जैन विचारांचा सुवास संपूर्ण विश्वाला मोहून टाकतो,” असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अक्षय जैन सर यांनी

“चांगल्या विचारांना कोणताही धर्म किंवा जात बंधन करत नाही,” असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रपठण कार्यक्रमातील थेट प्रक्षेपणाचा अनुभव घेतला.

कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटप करून करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम आनंद आणि भक्तिभावाने पार पडला.

Related News