राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक
आयोग दक्ष आहे. दरम्यान, पुणे पोलिसांना नाकाबंदी दरम्यान
Related News
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३८ कोटी रुपयांचे सोने
सापडले आहे. पोलिसांनी हे सोने जप्त केले असून, यासंदर्भात
निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला कळवण्यात आले
असल्याची माहिती पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
शहरातील विविध विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी
२४ तास नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण
पोलिसांनी ५ कोटींची रोकड जप्त केली होती. त्यानंतर मावळात
पावणे अठरा लाखांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर शुक्रवारी
(दि. २५) सकाळी सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत
नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी छोट्या टेम्पोत पोलिसांना हे
सोने आढळले. पोलिसांनी सोन्यासह चालक आणि वाहन ताब्यात
घेतले आहे. संबंधित कोट्यवधींचे सोने कुठून आले? कुणाचे आहे?
याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संबंधित वाहन हे ट्रान्सपोर्टचे असल्याची प्राथमिक माहिती समोर
आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/15-thousand-hectare-pikanchi-nasadi-in-buldhana-district/