१२ मे २०२५ | मुंबई
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीने टेस्ट
क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला आहे. कोहलीच्या या घोषणेनंतर क्रिकेट विश्वात भावना अनावर झाल्या असून,
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
काटेपूर्णा अभयारण्यात आज वैशाख पौर्णिमेला मचाणावरून होणार प्राणी गणना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी भावनिक पोस्टद्वारे कोहलीला शुभेच्छा दिल्या आणि एक खास आठवण शेअर केली.
सचिन यांनी लिहिले, “आज तू टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालास, पण मला आजही आठवतंय,
जेव्हा मी १२ वर्षांपूर्वी निवृत्त होत होतो, तेव्हा तू मला तुझ्या दिवंगत वडिलांचा एक धागा दिला होता.
हा माझ्यासाठी अतिशय खास आणि वैयक्तिक गिफ्ट होता, जो मी आजही जपून ठेवला आहे.”
सचिन पुढे लिहितात, “तुझी खरी वारसा ही आहे की तू लाखो तरुणांना क्रिकेटसाठी प्रेरित केलंस.
तुझा टेस्ट करिअर केवळ आकड्यांपुरता नव्हता, तर त्यामध्ये भारतीय क्रिकेटच्या नव्या युगाची पायाभरणी होती.”
विराटने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट पदार्पण केलं होतं.
१४ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने १२३ टेस्ट सामने खेळले, ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली.
आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये कोहलीने लिहिलं की, “टेस्ट क्रिकेटने मला घडवलं, परीक्षा घेतली आणि
आयुष्यभरासाठी शिकवण दिली. हे फॉर्मेट सोडणं सोपं नाही, पण आता वेळ झाली आहे.”
इंग्लंडविरुद्धच्या आगामी टेस्ट मालिकेपूर्वी कोहलीने निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chandrapurmadhyay-waghachi-panic-72-tasant-5-mahilankha-diet/