आलेगाव, दि. ८: चांन्नी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीच्या
विनयभंग प्रकरणातील गुन्ह्यांविरोधात आलेगावातील सर्व जाती-धर्माचे हजारो महिला-पुरुष एकत्र आले.
गावकऱ्यांनी माळी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान मुक मोर्चा काढला
आणि गावात कडकडीत बंद पाळून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील व्यवसायिक अशोक जानकिराम काळदाते यांच्यावर
अल्पवयीन मुलीच्या जबाबानुसार चांन्नी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा
दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली. या घटनेविरोधात
गावकऱ्यांनी निषेध मोर्चा काढत पोलीस प्रशासनाने योग्य चौकशी करून खोट्या गुन्ह्यांची नोंद रद्द करण्याची मागणी केली.
गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सभेमध्ये सहभाग घेतला.
त्यांनी खोट्या गुन्ह्यांवर नाराजी व्यक्त केली आणि पोलीस प्रशासनाने सत्य तपास करून निष्कर्षापर्यंत पोहोचावे,
अशी मागणी केली. चांन्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी याबाबत स्पष्टीकरण
देताना सांगितले की, “अल्पवयीन मुलीच्या प्रकरणांमध्ये कायद्याच्या
बंधनांनुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल.”
स्थानीय नागरिक व नेत्यांचे मत:
- मंगल तेलगोटे (वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता): “अशोक काळदाते हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचे असून त्यांच्यावर दाखल गुन्हे खोटे आहेत. प्रशासनाने गुन्हे मागे घ्यावेत.”
- जब्बार खान रुमखान: “अशोक काळदाते हे अशा कृत्यात सामील असूच शकत नाहीत. पोलीस प्रशासनाने त्यांना न्याय द्यावा.”
गावकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चा आणि सभेमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.
पोलीस बंदोबस्ताच्या सुरक्षेत मोर्चा व बंद शांततेत पार पडला.
गावकऱ्यांनी अशोक काळदाते यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली असून,
पोलीस प्रशासनाच्या पुढील तपासावर गावकऱ्यांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/valmik-karadchis-jail-term-extended-by-14-days-in-santosh-deshmukh-murder-case/