विदर्भात उन्हाचा कडाका, अकोल्यात तापमान ४१.३ अंशांवर

विदर्भात उन्हाचा कडाका, अकोल्यात तापमान ४१.३ अंशांवर

अकोला, १३ मार्च २०२५ – मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून,

बुधवारी विदर्भातील सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमान अकोला शहरात नोंदविण्यात आले.

नागपूरसह अनेक शहरांमध्येही तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे.

Related News

यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ४० अंशांच्या वर गेले असून, उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचे हवामान

विभागाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असून,

विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विशेषतः अकोला शहरात १४ आणि १५ मार्च रोजी उष्णतेची लाट राहू शकते,

त्यामुळे तापमान आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी,

पुरेसे पाणी प्राशन करावे आणि अत्यावश्यक कारणांशिवाय दुपारच्या उन्हात घराबाहेर पडू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

🌡 सावध राहा, उष्णतेपासून बचाव करा!

Read more news here : https://ajinkyabharat.com/wounded-sayela-male-jeevan-jeevadan-forest/

Related News