बार्शिटाकळी : “शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत मंजूर केली; मात्र ती वाटप करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची वाहने फोडून काही उपयोग नाही, फोडायचीच असतील तर सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांची फोडा!” — अशा तीव्र शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) बार्शिटाकळी येथे झालेल्या जाहीर सभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला.
आंबेडकर म्हणाले, “राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून आधी ३१ हजार कोटी रुपये, त्यानंतर वाढीव ११ हजार कोटी रुपये अशी एकूण ४२ हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. मात्र, ती रक्कम प्रत्यक्षात वाटप करण्याचा आदेश अद्याप दिलेला नाही. त्यामुळे ही मदत कागदावरच अडकली आहे.” त्यांनी भाजप सरकारवर टीका करताना केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी दोन्ही सरकारे सर्व स्तरांवर अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले.
सभेला माजी आमदार ॲड. खतीब साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, प्रतिभा सिरसाट, बळीराम चिकटे, अनुराधा ठाकरे, आयोजक अशोक कोहर, मंदा अरुणराव देशमुख, तालुका कार्याध्यक्ष गोरसिंग राठोड, ॲड. आशिष देशमुख, ॲड. गोपाल देशमुख, गोपाल चव्हाण, सतीष पवार, आशा ठाकरे, तसेच वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते नइमोद्दीन शेख, हाजी सय्यद रागिब, तमिज खान उर्फ गोबा सेठ, शहराध्यक्ष अजहर पठाण, इमरान फ्रूटवाले आणि तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचे संकेत; भोंदूबाबा प्रकरणामुळे वाढला दबाव
राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्य...
Continue reading
अशोक खरात अजितदादांवर काळी जादू करायचा?” राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्यानं राज्यात खळबळ
नाशिकमधील कथित भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणाने आता राज्याच्...
Continue reading
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारंपरारिक आणि बहुचर्चित गुढीपाडवा मेळावा २०२६ साठी आज संध्याकाळी शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथे होणार आहे. गेल्या ...
Continue reading
अकोल्यात धक्का ! उबाठाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि चार नगरसेवक – सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा काळे – यांनी Eknath Shinde यांच...
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
एकनाथ शिंदेंनंतर आता उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर; राज्यात राजकीय चर्चेला उधाण
महाराष्ट्रात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शिवसेना (शिंदे गट)चे
Continue reading
मुंबई – शिखर बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक ग...
Continue reading
बारामती : अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रश्न सध्या राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आ...
Continue reading
शालेय शिष्यवृत्ती वाढ, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना दरमहा 250 ते 400 रुपयेमहाराष्ट्रात सावित्रीबाई फुले शिष्यव...
Continue reading
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः Iran आणि Israel यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाज...
Continue reading
Sunetra Pawar Speech : महाराष्ट्र विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांचे पहिले भाषण भावनिक ठरले. महिला सक्षमीकरण, शक्ती कायदा आणि ...
Continue reading
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक कोहर यांनी केले तर संचालन ॲड. सुमीत मोहोड यांनी केले.
read also : https://ajinkyabharat.com/kudos-to-hardworking-students-from-rural-areas/