अज्ञात वाहनाच्या धडकेत मधापुरी येथील दोन जण जागीच ठार.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 कुरुमच्या उड्डाणपूलावरील घटना.
गावात शोक कळा.
माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कुरुम येथील उड्डाणपुलावर
दुचाकीने प्रवास करणाऱ्या दोन इसमाला अज्ञात वाहनाने जोरदार दिलेल्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना १६ फेब्रुवारी
Related News
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
सात दिवस, सात फळं! सफरचंदापासून किवीपर्यंत; आठवड्याभरात कोणत्या दिवशी कोणतं फळ खावं?
Healthy Tips : सध्याची धावपळीची जीवनशैली, अनियमित आहार आणि व...
Continue reading
KBC होस्ट करणं सोपं नाही; अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली मनातील खळबळ
बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून
Continue reading
EPFO Enrolment Campaign 2026 : नोकरीला 17 वर्षे पूर्ण झाली? मग ही संधी सोडू नका; PF सोबत पेन्शन आणि विम्याचाही लाभ
EPFO Enrolment Cam...
Continue reading
Pakistan सौदीच्या मदतीला युद्धात उतरणार? मक्का करारामुळे मध्यपूर्वेत नवा तणाव
Pakistan Mecca Pact : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमी...
Continue reading
DJ मुळे मंत्र्यालाच ऐकू येणे कमी; गुलाबराव पाटलांचा धक्कादायक अनुभव, गणेशोत्सवात डीजे न वाजवण्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डीजेच्या मोठ्या आवाजाचा मुद्दा पुन्...
Continue reading
इंजिनिअर हरले, तंत्रज्ञानही फेल! 170 वर्षे जुनी खडे हनुमानाची मूर्ती एक इंचही हलली नाही; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
सिंहस्थ महाकुंभ 2028
Continue reading
Sugar Rate : साखरेच्या दरात मोठी घसरण; केंद्राच्या १० लाख टन आयात निर्णयासमोर नवा पेच
देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आता केंद्र सरकारच्या साखर आय...
Continue reading
मनुस्मृतीचं दहन, जोरदार घोषणाबाजी; युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक, नागपुरात वातावरण तापलं
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी न...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
दारू-सिगारेटपेक्षाही धोकादायक ठरू शकते ही गोष्ट; तज्ज्ञांचा इशारा, हळूहळू आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
आरोग्य विशेष | एकटेपणाचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्य...
Continue reading
घरात प्लास्टिकची झाडे ठेवताय? जाणून घ्या शुभ की अशुभ; वास्तुशास्त्र काय सांगते?
घर सुंदर, आकर्षक आणि हिरवंगार दिसावं यासाठी अनेकजण घरामध्ये विविध प्रकारची झाडं आणि रोपं ठेवतात. मा...
Continue reading
रोजी रात्री सव्वा आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे . मृतकाचे नाव पिंटू सुखदेव सोनोने ( ४०) व
बाळू बबन गहुरकर (४७) दोघेही रा.मधापुरी येथील नागरिक असल्याचे समजते.
माना येथून जवळच असलेल्या मधापुरी येथील मृतक दोन इसम हे कुरुमला आठवडी बाजारात आले असता
गावी परत जायसाठी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून उड्डाणपूलावरून जातेवळी विरुद्ध दिशेने
अमरावतीकडून अकोल्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या जोरदार मारलेल्या धडकेत
पिंटू सुखदेव सोनोने व बाळू बबन गहुरकर हे दुचाकी क्र एम एच २७ टि ७०५४ या वाहनाने जात असताना जागीच गतप्राण झाले .
अपघाताची माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना मिळताच त्यांनी उपनिरीक्षक गणेश महाजन ,
सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे ,अंमलदार अविनाश बोरसे , दिपक सोळंके ,
उमेश हरमकर, पो का आकाश काळे , ललीत बनचरे , अक्षय आगलावे यांना घटनास्थळी रवाना केले ,
त्यांनी पोहचून वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत दोन्ही प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी
मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले .
पोलीस हे अज्ञात वाहनाचा सुगावा लागावा म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील कुरणखेड येथील टोलनाका
, हाटेल तसेच धाब्यावर असलेले सीसीटीव्ही पडताळणी करीत असल्याची माहिती माना पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी दिली .
सदरच्या अपघाताची बातमी लिहेस्तोर माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता .
अधिक बातम्या करीता येथे क्लीक करा
https://ajinkyabharat.com/mala-marathi-yait-naahi-jaa-majhi-takrar/