युनियन बँकेवर वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून ५४ लाखांचा दंड

मुंबईतील एका शाखेत काही खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांचा

अहवाल देण्यात अपयशी ठरल्याने आणि आर्थिक गैरव्यवहार

प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) योग्य ती काळजी न

Related News

घेतल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियावर

वित्तीय गुप्तचर यंत्रणेने (एफआययू) ५४ लाख रुपयांचा दंड

ठोठावला आहे. आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी

केंद्राकडून स्थापित वित्तीय गुप्तचर यंत्रणेने (फायनान्शियल

इंटेलिजन्स युनिट एफआययू) १ ऑक्टोबर रोजी ‘पीएमएलए’च्या

कलम १३ अंतर्गत युनियन बँकेला दंडाची नोटीस जारी केली होती.

बँकेकडून तिला प्रतिसाद म्हणून दाखल लेखी आणि तोंडी उत्तर

विचारात घेतल्यावर तिच्यावरील आरोपांची पुष्टी करत, ही दंडाची

कारवाई केली गेली. बँकेच्या कारभाराचा व्यापक आढावा घेण्यात

आला, ज्यात केवायसी (तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या) आणि

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए)

अनुपालनाशी संबंधित अनेक उल्लंघने आणि अनियमितता

उघडकीस आल्या. युनियन बँकेच्या मुंबईतील हिल रोड शाखेशी

संलग्न हे प्रकरण आहे. येथील विशिष्ट चालू खात्यांच्या स्वतंत्र

तपासणीत असे दिसून आले की, बँकेतर वित्तीय कंपनी

(एनबीएफसी) आणि तिच्याशी संबंधित संस्थांची खाती मोठ्या

प्रमाणात संशयास्पद निधी हस्तांतरणामध्ये (सर्क्युलर फंडिंग)

गुंतलेली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/39-complaints-received-regarding-violation-of-code-of-conduct-28-complaints-removed/

Related News