अकोट प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर)
यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
१० मे रोजी अकोट ग्रामीण रुग्णालयात झालेल्या या उपक्रमात ४१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, वाढदिवस साजरा करताना केक कापणे किंवा
फटाके फोडण्याऐवजी भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅली व रक्तदान उपक्रमांचे आयोजन करावे.
या उपक्रमात भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अकोट वंचित बहुजन युवक आघाडीने केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष आशिष रायबोले, महासचिव अमन गवई, रोशन पुंडकर,
सुरेंद्र ओइंबे, सुनीताताई हिरोळे, तसेच उमेश लबडे, सचिन सरकटे, अक्षय तेलगोटे, प्रमोद सोनोने,
स्वप्निल सरकटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व युवक आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या उपक्रमाचे अकोट शहरात सर्वत्र कौतुक होत असून,
रक्तदानासारख्या विधायक उपक्रमातून सामाजिक भान जपण्याचा संदेश देण्यात आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/owaisincha-pakistanvar-ghanaka-rule-soda-soda/