​खापरखेड फाट्यावर कार आणि ऑटोचा भीषण अपघात ; 1 प्रवाशाचा जागीच मृत्यू ,अनेक गंभीर जखमी

​खापरखेड

​​तेल्हारा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच; ऑटोचा चक्काचूर, पोलीस घटनास्थळी दाखल.

खापरखेड : तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून, तेल्हारा-खापरखेड रस्त्यावरील खापरखेड फाट्यावर आज सायंकाळी एक कार आणि ऑटो यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका ऑटो प्रवाशाचा रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला असून, ऑटोमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.​मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या कारने ऑटोला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ऑटोचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे, तर कारचेही मोठे नुकसान झाले आहे. ​अपघातानंतर गंभीर जखमींना तातडीने ॲम्बुलन्स व्हॅनने अकोला येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे तेल्हारा-खापरखेड मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. ​या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठाणेदार तुनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. मात्र, या घटनेची अद्यापपर्यंत कोणतीही औपचारिक गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. तेल्हारा परिसरात अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/india-vs-australia-1st-odi-result-438-days-long-reign-sampvali-from-australia-team-india-la-defeat/

Related News

Related News