तुळजा भवानी मूर्तीच्या स्थलांतराची चर्चा – काय आहे सत्य?

तुळजा भवानी मूर्तीच्या स्थलांतराची चर्चा – काय आहे सत्य?

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानीच्या मुख्य गाभाऱ्याचा आकार वाढविण्याच्या हालचाली सुरु आहेत.

तुळजा भवानीच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी होत आहे.

या मंदिराचा जीर्णाद्धार सुरु असताना टाईल्स काढले तेव्हा शिखराचे वजन ज्या चार बीमवर आहे,

Related News

त्यापैकी दोन बिमचे मोठे नुकसान झालेले आहे. तुळजापूरच्या मुख्य गाभाऱ्याचा डोलारा या चार खांबांवर

असून त्यापैकी दोन खांब जर कमकुवत झाले असल्याने या मंदिराचा जीर्णाद्धार करताना हे मंदिर त्याच जागी पूर्वी होते

तसेच बांधण्यात येणार आहे. या मंदिराचे नाव संरक्षित पुरातन वास्तूत असल्याने

हे काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. राज्य संरक्षित मंदीर असल्याने गाभाऱ्याचा

प्रत्येक दगड काढून नव्याने हे मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाभाऱ्याची जागा तेवढीच राहील.

या मंदिराच्या बांधकामाला दोन वर्षे देखील लागू शकतात, त्यामुळे तोपर्यंत या मंदिरातील

आई भवानी मातेची मूर्ती दोन वर्षे इतरत्र हलविण्यात आले आहे असे तुळजापूरचे

आमदार मंदिराचे ट्रस्टी राणा जगजीत सिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/travhlingmadhun-kamwa-lakh-janoon-sorrow-top-10-jobs/

Related News