पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कधी निसर्ग साथ देत नाही, कधी बाजारभाव कोसळतो – परिणामी उत्पन्नात घट होते.
पण अकोल्याच्या दिग्रस गावातील एका महिला शेतकऱ्याने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आहे.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
उर्मिला शेलगावकर यांनी पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत कलिंगडाच्या शेतीत यशाचं पाणी पाजलं आहे.
केवळ एका एकरातून त्यांनी अडीच लाखांचं उत्पन्न घेतलंय. पाहूया त्यांची ही यशोगाथा..
पातूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं कार्य
आज पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांनी एका एकरात कलिंगडाची लागवड करून, योग्य नियोजन,
मशागत आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानं अवघ्या 75 दिवसांत अडीच लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
आणि अजूनही 25 ते 30 हजारांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक कलिंगड सरासरी 6 ते 7 किलो वजनाचं असल्याने, त्यांच्या मालाला बाजारात मोठी मागणी आहे.
यशामागे नियमित पीकनिरीक्षण, आंतर मशागत आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचा मोठा वाटा आहे.
याच आत्मविश्वासातून त्यांनी आता आणखी दोन एकरांत कलिंगडाची लागवड सुरू केली आहे.
विशेष म्हणजे उर्मिला या एम.ए., बी.एड. शिक्षण घेतलेली असूनही नोकरीचा माग नाही धरला,
शेती व्यवसायात पाऊल टाकून त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण
उर्मिला यांच्या या प्रवासात त्यांचे पती, जगन्नाथ शेलगावकर, हे कायम त्यांच्या सोबत उभे राहिले.
शेतीतील प्रत्येक निर्णयात उर्मिलांची भूमिका निर्णायक असली,
तरी या वाटचालीत पती-पत्नीने एकत्र शेती करणं ही त्यांची यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sanandancha-dhikhi-karyancha-nationalist-ajit-pawar-middle-admission/