वारकऱ्यांची वाहने आणि पालख्यांना टोल माफी !

यंदा

यंदा वारकऱ्यांसाठी सरकारसुद्धा घोषणांचा पाऊस पाडत आहे.

ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविक

आपल्या खासगी वाहनांनी विठुरायांची पंढरी गाठत असतात.

Related News

अशाच भाविकांना राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे.

वारकऱ्यांची वाहने आणि पालख्यांना टोल माफी आजपासून करण्यात आली आहे.

येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा उत्सव आहे.

मागील वर्षीसुद्धा राज्य सरकारने आषाढी एकादशीला जाणाऱ्या

खासगी वाहनांवरील टोल माफ केला होता

आणि सरकारच्या नियोजनाप्रमाणे मोठ्याप्रमाणात भाविक सुद्धा

खासगी वाहनाने हजर झाले होते.

हाच निर्णय लागू करत यावर्षी सुद्धा खासगी वाहने,

बस, टेम्पो, चारचाकी यांच्यावरील टोल माफ केला आहे.

आजपासूनच पंढरपुराकडे जाणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही.

३ जुलै ते २१ जुलै दरम्यान कोणताही टोल भरावा लागणार नाही.

शासनाच्या निर्णयामुळे वारकऱ्यांचा खिशावरील अतिरिक्त भार कमी होईल.

यामध्ये वारकऱ्यांचा वाहनांना परिवहन विभागातून विशेष स्टीकर देण्यात येतील.

फक्त वारीनिमित्त निघालेल्या वाहनांनाच ही सवलत मिळणार आहे,

तर पंढरपूरहून निघणाऱ्या सर्व वाहनांना सवलत लागू असेल.

गरज असल्यास घाटातील अवजड वाहनांची ये जा बंद करा

अशा सूचना सुद्धा स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-champai-sorens-resignation/

Related News