मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ अंतर्गत दिनांक ०२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर ईव्हीएम सुरक्षित साठवणुकीसाठी स्ट्राँग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी होणारी मतमोजणी नंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी घेऊन निकाल जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, स्ट्राँग रूमच्या साठवणुकीची पूर्ण जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी स्वीकारली असून, मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी गोडाऊनमध्ये आवश्यक सर्व सुरक्षा उपकरणे व बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. २४ तास सशस्त्र सुरक्षा तैनात करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजित जाधव यांनी १४ डिव्हिजनल व ६ मुख्यालयाचे एकूण २० पोलिस कर्मचारी सतर्कतेने पहारा देण्यासाठी नियुक्त केले आहेत. यात एसआरपीएफची तुकडीदेखील समाविष्ट आहे. संपूर्ण त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी पी. एस.आय. गणेश सूर्यवंशी व चंदन साहेब यांच्याकडे आहे.
सुरक्षा व्यवस्थापनाची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार, पोलिस निरीक्षक अजित जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांनी केली. राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी गोडाऊनमध्ये प्रवेश करून सुरक्षा व्यवस्था पाहू शकतात. उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्र साठवणूक गोडाऊनच्या बाहेरून पाहता येईल अशा ठिकाणी बसण्याची सोय करण्यात आली आहे.
Related News
दिशा सालियन प्रकरणाच्या CBI चौकशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण ...
Continue reading
तुकाराम मुंढेंची ‘हवा’! रवीना टंडनला रेस्टॉरंटमध्ये आला भन्नाट अनुभव; म्हणाली, ‘आता भीतीच संपली!’
प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि धडाकेबाज ...
Continue reading
दिल्लीतील CJP आंदोलनाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले असून पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. शिक्षणमंत्री धर्मे...
Continue reading
शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या आंदोलनात काही काळ तणाव; स्टेज उभारणीवरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिव...
Continue reading
भोर नगरपालिकेत विनापरवानगी फर्निचरची कामे केल्याच्या तक्रारीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे कार्यालय सील केले. या अभूतपूर्व कारवाईमु...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना: महापौरांना उच्च न्यायालयाची फटकार, ‘तक्रार करायची असेल तर समितीकडे करा’; 5 ऑगस्टला पुढील सुनावणी
छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन
Continue reading
तृणमूलच्या बँक खात्यावरून हायकोर्टाचा मोठा आदेश; ममता बॅनर्जींच्या अडचणी कमी
ममता बॅनर्जींचा गेम फिरला : पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडी...
Continue reading
Nashik Heavy Rain: 3 दिवसांसाठी सप्तशृंगी देवी मंदिर बंद; मुसळधार पावसाचा धोकादायक इशारा, प्रशासनाचा मोठा निर्णय
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध शक्तीपीठ ...
Continue reading
राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेत धक्का; SRPF जवानाच्या मृत्यूमागचं कारण काय?
मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या अतिसुरक्षित राजभवनातून सोमवारी सकाळी एक अत...
Continue reading
महापौर संतापल्या : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नालेसफाई आणि स्वच्छता कामांचा आढावा घेताना मोठा प्रशासनिक गोंधळ समोर आला आहे.
Continue reading
या कठोर सुरक्षा उपाययोजनांमुळे स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यास व मतमोजणीपूर्वी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकार टाळण्यास सक्षम वातावरण तयार करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करत प्रशासनाने पूर्ण पारदर्शक व सुरक्षित प्रक्रिया सुनिश्चित केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akot-daryapur-roadwar-truck-overturns-carrying-500-carats-loss/