अजिंक्य भारत ब्रेकिंग
खामगाव-शेगाव रोडवर भीषण अपघात घडला असून, तीन वाहनांचा समावेश असलेल्या
या दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Related News
Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटमधून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Vikram-1 Launch यशस्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. ...
Continue reading
सकाळी कोमट पाण्यात मध पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिसळून पिणे हा...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यक...
Continue reading
सोनम वांगचूक रुग्णालयात; ‘माझ्या परवानगीशिवाय कोणतेही औषध देऊ नका’, पत्नी गीतांजली यांची सफदरजंग रुग्णालयाला विनंती
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक
Continue reading
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
Japan Open 2026 : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव आणखी वाढला; ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तेलवाहू टँकर दुर्घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर चिंता
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराण आणि अमेरिका यांच्याती...
Continue reading
शेगावकडून खामगावकडे येणारी बोलेरो गाडी आणि खामगावहून शेगावकडे जाणारी
खाजगी प्रवासी ट्रॅव्हल यांच्यात आज सकाळी जयपुर लांडे ब्रीज आणि सिद्धिविनायक टेक्निकल
कॅम्पसच्या जवळ समोरासमोर धडक झाली. या धडकेत गंभीर नुकसान झाले असताना,
त्याचवेळी मागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्लीपर बसने ट्रॅव्हलला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात बोलेरोमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, ट्रॅव्हलमधील
एक प्रवासी मृत झाला आहे. तसेच, बोलेरो आणि ट्रॅव्हलमधील
एकूण पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण
पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
जखमींना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.