शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे अजूनही चिंता
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा काळ उलटला असला,
तरी जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही.
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
तुमचे वैयक्तिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे?
अनेक भागात पेरण्या रखडल्या असून, जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अकोल्यात विखुरलेल्या स्वरूपात का होईना,
पेरणीयोग्य पाऊस झाल्याने ८० टक्क्यांच्या वर पेरण्या आटोपल्या असल्या,
तरी काही तालुक्यांमध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती नाही.
अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे.
याशिवाय मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते.
कपाशी पिकाच्या लागवडीसाठी दमदार पावसाची गरज भासते;
मात्र जुलै महिन्याच्या ८ व ९ तारखेला कोसळलेल्या पावसानंतर पावसाने ब्रेक घेतला असून,
पावसाअभावी रोवणीची कामे रखडली आहेत.
जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस नसल्याने चिंतेचे ढग कायम आहेत.
पाऊस लांबल्याने मूग, उडीद या कडधान्याची लागवड स्थिरावली आहे.
१५ जुलैपर्यंत कडधान्यांची पेरणी करता येईल. त्यानंतर मूग,
उडीद आणि भुईमुगाची पेरणी करू नये, अशी कृषी विभागाची शिफारस आहे.
त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमालीचे घटण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, कापूस पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला आहे.
या पिकांच्या वाढीसाठी पुरेशा पावसाची गरज आहे.
पेरणी झालेली पिके पावसाअभावी उलटण्याचा धोका आहे.
अनेक ठिकाणी पेरण्या जगविण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यामधून
सिंचन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mg-shows-glimpse-of-cyber-u200bu200bconcept/