म्युझियमने पाठविलेल्या पत्रात स्पष्ट कबुली
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे
छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत.
Related News
या संदर्भात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याशी माझा पत्र व्यवहार झाला आहे.
या पत्रात देखील वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा
कोणताही पुरावा नसल्याचे म्युझियम कडून सांगण्यात आले आहे.
यामुळे महाराष्ट्र सरकार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
शिवभक्तांची फसवणूक करू नये,
असे परखड मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केले आहे.
ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात मोठा इतिहास मिळाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तू आणि गडकोट किल्ल्यांसंदर्भात
प्रत्येक शिवभक्ताला आकर्षण आणि श्रद्धा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या कोथळा
ज्या वाघ नखांनी बाहेर काढला ती वाघ नखे सध्या लंडन येथील
विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असल्याचा अनेक जण दावा करतात.
महाराष्ट्र सरकारने ही वाघनखे पुन्हा राज्यात आणण्याचा प्रयत्न करत असून
तीन वर्षांकरीता भाडेतत्वावर आणण्याचा सामंजस्य करार करण्यात आला
यामुळे ही वाघ नखे लवकरच महाराष्ट्रात येत आहे.
मात्र या वाघनखा संदर्भात नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असलेली वाघनखे
ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण
म्युझियमनेपत्राद्वारे कळविले असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.
या संदर्भात मी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून माहिती मागवली असता,
त्यांच्याकडून लिखित स्वरूपात सांगण्यात आले की,
म्युझियमकडे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा नाही.
सदर वाघनखे १९७१ या साली म्यूजियमकडे भेट म्हणून आली आहेत.
खरी वाघनखे साताऱ्यातच
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ही
मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहेत.
आणि पुरावे ठोसपणे सांगतात की,
ती वाघनखे साताराच्या छत्रपर्तीच्याकडे कायम राहिली आहेत.
महाराष्ट्राची अस्मिता या वाघनखांशी जोडली गेली आहे,
म्हणून लंडन मधील असणाऱ्या वाघनखांच्या प्रतिकृतीला
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आहेत,
असे सांगून छत्रपतींच्या आणि विशेषतः पेशव्यांच्या कैदेतून सुटून
सातारा राज्याची पुर्नस्थापना करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या विश्वासहार्यतेला
तडा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय की काय,
अशी शंका उत्पन्न होत असून खरी वाघ नख ही साताऱ्यातून बाहेर गेल्याची
किंवा कोणाला भेट दिल्याचा पुरावा नाही.
यामुळे याबाबतची अधिकची माहिती स्वतः उदयन महाराज देऊ शकतील.
त्यामुळे त्यांनी या संदर्भात जनतेसमोर येऊन बोलायला हवं, असेही इंद्रजीत सावंत यावेळी म्हणाले आहेत
Read also: https://ajinkyabharat.com/america-recession-worldwide-red-alert/