चिनी स्मार्टफोन निर्माता विवोनं आपल्या लोकप्रिय V-सीरीजमध्ये एका नव्या हँडसेटचा समावेश केला आहे. कंपनीनं सेल्फी सेंट्रिक Vivo V30e भारतात आणला आहे. याची खासियत म्हणजे 5500mAh बॅटरी असलेला जा भारतातील सर्वात पातळ फोन आहे. याच्या बॅक पॅनलवर ऑरा लाइटसह 50MP Sony IMX882 मेन कॅमेरा OIS सपोर्टसह मिळतो. फोनमधील फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे 4K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात.
Vivo V30eची किंमत
नवीन डिवाइस कंपनीनं स्टाइलिश डिजाइनसह सादर केला आहे आणि यात अल्ट्रा-स्लिम ३डी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन लग्जरी डिजाइनसह दोन कलर ऑप्शंस-व्हेल्वेट रेड आणि सिल्क ब्लू कलरमध्ये आला आहे. याच्या ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये आहे. तर ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसाठी २९,९९९ रुपये मोजावे लागतील.
Vivo V30e ची विक्री ९ मे २०२४ पासून सुरु होईल. हा फोन कंपनी वेबसाइट आणि पार्टनर रीटेल स्टोर्स व्यतिरिक्त ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकत घेता येईल. या डिवाइसची प्री-बुकिंग सुरु झाली आहे आणि खास डिस्काउंट किंवा ऑफर्सचा फायदा देखील मिळत आहे. ऑफलाइन स्टोर्सवर ICICI, SBI, IndusInd, IDFC आणि अन्य बँक कार्ड्सनी पेमेंट केल्यास १० टक्क्यांची सूट मिळत आहे.
Related News
Top 10 Richest Banks 2026: 94.42 लाख कोटींची संपत्ती असलेली जगातील नंबर 1 बँक, भारत कुठे ?
जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकिंग क्षे...
Continue reading
NSE चा IPO अखेर मार्गी; 14.89 कोटी शेअर्सच्या विक्रीसाठी DRHP दाखल
NSE चा IPO अखेर मार्गी : मुंबई : देशातील सर्वात मोठी स्टॉक एक्स्चेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (N...
Continue reading
धक्कादायक रिपोर्ट! Flipkart, Nykaa च्या छुप्या ट्रिक्समुळे भारतीयांना 28,000 कोटींचा फटका
Flipkart, Nykaa वर शॉपिंग करताय? 28,000 कोटींच्या डिजिटल लु...
Continue reading
LIC ची ऐतिहासिक झेप! 5.14 लाख कोटी मार्केट कॅपसह सार्वजनिक क्षेत्रात अव्वल स्थान
भारताच्या आर्थिक क्षेत्रात पुन्हा एकदा भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC
Continue reading
Oppo Find X9 Ultra Launch: 200MP कॅमेरा, Snapdragon 8 Elite Gen 5 आणि 100W चार्जिंगची पॉवर
भारतातील प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी खळब...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
विदर्भातील संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथील युवा लेखिका मैथिली लक्ष्मी पुरुषोत्तम गोतमारे हिने अवघ्या १४ व्या वर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपले पहिले क...
Continue reading
ईएमआयचा भार होणार हलका, SBI ने गृहकर्ज स्वस्त करून ग्राहकांना दिली खुशखबर
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया SBI
Continue reading
जाणून घ्या SBI FD 5 lakh return कसा मिळतो, नवीन व्याजदर, मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा आणि वरिष्ठ नागरिकांसाठी फायदे. सुरक्षित गुंतवणुकीचा उ...
Continue reading
Share Market मध्ये गेल्या 5 दिवसांत टॉप 10 कंपन्यांचे बाजारमूल्य कसे बदलले? भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स आणि LIC वर तपशीलवार व...
Continue reading
भारतीय Share Market मध्ये 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीत तेजी-घसरणीचा वेगवान ट्रेंड पाहायला मिळाला. या चार दिवसांच्या काळात सेन्सेक्स...
Continue reading
Vivo V30eचे स्पेसिफिकेशन्स
नवीन स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचाचा ३डी कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले हाय-रिफ्रेश रेटला सपोर्टसह देण्यात आला आहे. याची जाडी फक्त ७.६५मिमी आहे. Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर मिळतो. विवो फोन अँड्रॉइड १४ आधारित फन टच ओएस १४ वर चालतो. कंपनी या फोनला तीन मोठे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्ष सिक्योरिटी अपडेट्स देणार आहे.
पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५५००एमएएचची मोठी बॅटरी मिळते. हा फोन ४४वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर 50MP OIS Sony IMX 882 प्रायमरी सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप स्टूडियो क्वॉलिटी ऑरा लाइटसह मिळतो. यात ५०एमपी आय-ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या डिवाइसची मॅन्युफॅक्चरिंग विवो इंडियाच्या ग्रेटर नोयडा मधील फॅक्टरीमध्ये केली जात आहे.