[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे. पत्रकार संघटनेचा संताप या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांची निष्काळजी भूमिका? हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले. पोलिसांच्या या दिरंगाईवर पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निर्भीड पत्रकारितेवर हल्ला? विठ्ठल महल्ले हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक धाडसी वृत्तांकन केले आहे. त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी करा! पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला!

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोज...

Continue reading

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार असून, ते माजी सरपंच ...

Continue reading

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे याविषयी वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरु...

Continue reading

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: 'दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि...', दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा 'तो' धक्कादायक खुलासा...

Continue reading

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

आताची मोठी बातमी, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, NIA पथक छत्रपती संभाजीनगरात, अपडेट काय?

NIA team in Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापले आहे. त्यातच नागपूरमध्ये हिंसाचार उफळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मराठवाड्यातील...

Continue reading

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

शिवसेना शिंदे पक्षाच्या माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं

जळगाव तालुक्यातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंचाचा निर्घृण खून ! चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्याने ते जागीच कोसळले अशी माहिती समोर आली आहे. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच सं...

Continue reading

Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!

Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा ‘खजिना’ पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!

Yashwant Verma : या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर, CJI संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा न...

Continue reading

अंबरनाथमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी उपोषण; अधिकार्‍यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन

अंबरनाथमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी उपोषण; अधिकार्‍यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन

Ambarnath Water Issue : माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.निनाद करमरकर, अंबरनाथ Ambarnath News : अंबरनाथच्या शिव...

Continue reading

तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

तुमच्या दिवसाची सुरुवात भोपळ्याच्या बियांनी करा, जाणून घ्या या बियाण्याचे फायदे!

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि दररोज सकाळी त्यांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, तथापि, तुम्हाला हे बियाणे कसे खावे हे माहित असले पाहिजे. भोपळ्याच्या ...

Continue reading

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया अकोट – तीन दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकावर हेमंत गावंडे यांच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर...

Continue reading