सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे
याविषयी वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेल्या वादाला १७ मार्च रोजी हिंसक वळण आले.
नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री याच मुद्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला.
Related News
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : सरकारी कंपन्याही वाढवणार पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या आजचा भाव
Petrol Diesel Prices Today 6 October 2026 : Petrol आणि डिझेलच्या दरांक...
Continue reading
दांडूके चालवा, बंदुका रोखा, आम्ही जाणारच! संजय राऊत यांचा सरकारला मोठा इशारा
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा; संसद भवन ते आयोगाच्या कार्यालयापर्यंत कडेकोट ...
Continue reading
जगाने श्वास रोखला! ब्रिटिश एअरवेजचे विमान अचानक 28 हजार फूट खाली; आयर्लंडच्या आकाशात खळबळ
फ्लायदुबईच्या विमानाशी संबंधित धक्कादायक घटना चर्चेत असतानाच विमान वाहतुकीशी संबंधित आणखी...
Continue reading
SIR वरून विरोधकांच्या आरोपांना फडणवीसांचे सणसणीत उत्तर; अचूक मतदार यादीसाठी महत्त्वाचे 8 मुद्दे समोर
Devendra Fadnavis on SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR 2026...
Continue reading
जंतरमंतरवर जाण्यापासून रोखलं तर काय? CJPचा ‘प्लान बी’ तयार; जिथे अडवतील तिथेच आंदोलन
कथित निवडणूक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली असून, मुख्य निवडणू...
Continue reading
फ्लायदुबईच्या विमानातील हल्ला : ओमानी सह-पायलटबाबत धक्कादायक माहिती; तपासात नवे खुलासे
दुबई : फ्लायदुबईच्या दुबई-तेल अवीव विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांच्...
Continue reading
Green Teaफक्त पिण्यासाठी नाही; त्वचेच्या ग्लोसाठीही ठरू शकते उपयोगी, जाणून घ्या वापरण्याच्या ५ सोप्या पद्धतीGreen Tea हा आरोग्यासाठी फायदेशीर पेय म्हणून ओळखला जातो....
Continue reading
17 हजार फुटांवर विमान अचानक खाली झेपावलं; कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूने हल्ला, मुंबईच्या कॅप्टनने उधळला मोठा कट
फ्लायदुबईच्या दुबई ते तेल अवीव या विमानप्रवासात बुधवारी (30 सप्टेंबर) ...
Continue reading
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
दिनो मोरियाला अटक होणार? मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात EOWची चौकशी; नेमकं प्रकरण काय?
दिनो मोरियाची EOWकडून चौकशी : अभिनेता दिनो मोरिया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मिठी नदीच...
Continue reading
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद; शौर्याला सलाम, म्हणाले—भारताला तुमचा अभिमान
मोदींचा कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद : दुबईहून तेल अ...
Continue reading
Parth Pawar प्रकरणावर विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल; ‘गरीबांवर कारवाई आणि मोठे मोकाट फिरण्यासाठी का?’
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी Parth Pawar यांच्याशी संबंधित मुंडवा ज...
Continue reading
दोन्ही बाजूंकडून दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले.
अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दगडफेक करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना पोलीसही जखमी झाले.
दगडफेकीच्या घटनेत 8 ते 10 पोलीस जखमी झाले. आग विझवण्यासाठी आलेले अग्निशमन दलाचे चार जवानही जखमी झाले.
औरंगजेबच्या कबरीचा वाद हा ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरु झाला. आता यावर एका अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत आहे.
बिग बॉस १३मध्ये सहभागी झालेला अभिनेता आणि राजकीय विश्लेषक तहसीन पूनावालाने ट्विटरवर
‘या सगळ्याला विकी कौशल नाही तर थर्ड ग्रेड अभिनेत्री जबाबदार आहे’ अशी टिप्पणी केली.
आता हा अभिनेता नेमकं काय म्हणाला जाणून घ्या…‘ज्याने छावासारखा ब्लॉकबस्टर हिट सिनेमा दिला आणि
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली त्या अभिनेत्याला, विकी कौशलला नागपूरमधील राड्यासाठी जबाबदार धरण्यात येत आहे.
हे फारच खेदजनक आहे. एखादी कला मग ते सिनेमा असो, पुस्तक असो किंवा सर्जनशीलता असो त्याच्यात दंगल भडकावण्याची ताकद नसते.
ही कला फक्त समाजाला आरखा दाखवून देऊ शकते ना की आग पेटवू शकते.
जर सिनेमात प्रॉब्लम असेल तर तो पाहू नका किंवा चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, कोणाला पुस्तक आवडलं नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करा
किंवा याहून अधिक चांगली कथा लिहा’ असे अभिनेता म्हणाला. पुढे तो म्हणाला, ‘हिंसा करणे हा कोणाचाही अधिकार नाही.
या सगळ्यामागचा खरा गुन्हेगार हा अबु आजमी आणि तिसऱ्या दर्जाची अभिनेत्री आहे. त्यांनीच केवळ उजव्या
विचारसणीच्या लोकांना विरोध करायचा म्हणून औरंगजेबाचा उदो उदो केला.
इतकच नाही तर महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार टी राजा यांनीही आगीत तेल ओतले.
तुम्ही लक्षात घ्या, आजमींचे, नितेश राणेंचे आणि टी राजांची मुले या दंगलीत रस्त्यावर नव्हती.
कारण विशेषाधिकार असलेल्या या लोकांनी अराजकता निर्माण केली आणि याचा त्रास गरिबांना सहन करावा लागला.
हा द्वेष पसरवणे थांबूया. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंदचा नारा देऊया. रमजानच्या या महिन्यात एकमेकांनाच
आपले कुटुंब समजून एकत्र येऊन आलिंगन देऊया. भारत अविभाजितरित्या विकास करो आणि समृद्ध होवो.’