माना येथे ईद-उल-फितर उत्साहात साजरी

माना येथे शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून ईद-उल-फितर साजरी

शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून दिल्या शुभेच्छा

माना: माना येथे ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात आणि बंधुतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

शेकडो मुस्लिम बांधवांनी ईदगाह आणि मस्जिदमध्ये एकत्र येऊन नमाज अदा केली आणि अल्लाहचे आभार मानले.

Related News

समाजात शांतता, एकता, आणि बंधुता अबाधित राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सकाळी 8:45 वाजता कमिटीचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीमदिन यांच्या

मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी मस्जिदमध्ये एकत्र आले.

त्यानंतर माना येथील ईदगाहवर 9:30 वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आले.

नमाज संपल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आपुलकी व्यक्त केली.

पोलीस प्रशासनाची उपस्थिती आणि  मान्यवर

सणाचा उत्साह सुरळीत पार पाडण्यासाठी माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार सूरज सुरोशे

आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता.

समाजात सौहार्द आणि शांतता टिकावी यासाठी पोलिस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रसंगी मेंबर कमिटीचे असा दुल्हा खान, नदीम सोनू, जुनेद अहमद, नवे दुल्हा जमादार,

फईमुद्दीन, होजा हीप मोहम्मद, समीर कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related News